राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढतेय. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यात आता आणखी एका कलाकाराला करोनाची लागण झाली आहे. अभिनेता अर्जुन रामपालला करोनाची लागण झाली आहे. त्याने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

अर्जुन रामपालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट करत करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जरी मला करोनाची लक्षणे दिसतं नसली तरी मी घरात आयसोलेशनमध्ये राहत आहे, मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. गेल्या १० दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या. ही वेळ आपल्या सगळ्यांसाठी भयानक आहे. मात्र, जर आपण थोडावेळ शांत आणि जागरूक राहिलो तर आपल्याला त्याचा फायदा होईल. एकत्रितपणे, आपण करू शकतो आणि आपण करोनाशी नक्कीच लढू,” अशा आशायची पोस्ट अर्जुनने केली आहे. त्याची ही पोस्ट पाहताच अर्जुनच्या चाहत्यांनी आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत असे म्हणत कमेंटचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun (@rampal72)

अर्जुनच्या आधी अनेक बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण झाली होती. त्यात आलिया भट्ट, अक्षय कुमार, गोविंदा, रणबीर कपूर, कार्तिक आर्यन सारख्या कलाकारांचा समावेश आहे.

दररोज मोठ्यासंख्येने रूग्ण आढळून येत असल्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. आता कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेशिवाय इतर कोणाला प्रवास करता येणार नाही आहे. हे निर्बंध ३० एप्रिल पर्यंत असणार आहेत.

Story img Loader