अभिनेता शाहिद कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘कबीर सिंग’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हा हिंदी रिमेक आहे. अर्जुन रेड्डी हा चित्रपट तुफान गाजला. त्यामुळे हिंदी रिमेकची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. या टीझरमधील शाहिद कपूरचा लूक हुबेहूब अर्जुन रेड्डीसारखाच आहे.
अर्जुन रेड्डीमध्ये मुख्य भूमिका साकारणारा विजय देवरकोंडा आणि कबीर सिंगच्या लूकमधील शाहिद कपूर हुबेहूब आहे. टीझरमधील शाहिदचं दमदार अभिनय विशेष लक्षवेधी ठरतंय. या चित्रपटात शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसत आहे. शाहिदसोबतच टीझरमध्ये कियारा अडवाणीचीही झलक पाहायला मिळत आहे. प्रेमातला वेडेपणा आणि प्रेयसी सोडून गेल्यानंतर व्यसनाधीन झालेला कबीर सिंग टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. ‘एम.एस. धोनी’, ‘लस्ट स्टोरी’ मध्ये कियारानं काम केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं कियारा, शाहिद पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.
#ArjunReddy is a cult classic… Comparisons between #ArjunReddy and its #Hindi adaptation #KabirSingh are inevitable… Here's #KabirSinghTeaser: https://t.co/n4c7BC7dS9
— taran adarsh (@taran_adarsh) April 8, 2019
‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं होतं. रिमेकचं दिग्दर्शनही संदीप वांगा करत आहेत. हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे.