९/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेतील सर्वच घटकांमध्ये अंतर्बाह्य़ बदल घडले. समाजजीवन ढवळून निघाले. सांस्कृतिक वातावरण भयाने खालसा केले. सर्वच मुद्रित-इलेक्ट्रानिक माध्यमांनी अफगाणिस्तान-पाकिस्तान आणि ओसामा बिन लादेन याच्याविषयी वृत्तदळण दळून भयाचे चर्वणप्राश नागरिकांमध्ये मुरविले. व्हिडीओ गेमपासून छोटय़ा-मोठय़ा पडद्यावरदेखील ओसामा बिन लादेन हा दहशतवादाचे प्रतीक म्हणून सातत्याने समोर आणले जाऊ लागले. मॉर्गन स्परलॉक या दिग्दर्शकाने ‘व्हेअर इन द वल्र्ड इज ओसामा बिन लादेन’ नावाची एक गमतीशीर डॉक्युमेण्ट्री केली. ज्यात या दिग्दर्शकाने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या संवेदनशील भागांमध्ये फेरफटका करून ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या माहितीपटासोबत सातत्याने वृत्तवाहिन्या, साप्ताहिके, मासिके दहशतवादाबद्दल आणि अफगाणिस्तान-पाकिस्तानबद्दल इतकी माहिती पुरवत होते की, अमेरिकी लोकांना आपल्या देशाहून अधिक या देशांचीच माहिती व्हायला लागली. यातूनच इस्लाम धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या अफगाणिस्तान-पाकिस्तानमधील दहशतवादाला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेतील गॅरी फॉकनर या सर्वसामान्य व्यक्तीने धर्माचा आधार घेत ओसामा बिन लादेनला पकडण्याचा पण जाहीर केला. देवाने आपल्याला लादेनला मारण्यासाठी आज्ञा केली असल्याचे सांगत या व्यक्तीने शिडाच्या छोटय़ाशा होडीने प्रशांत महासागर पार करीत पाकिस्तान गाठण्यासाठी अजब प्रवास सुरू केला. त्याच्या होडीने दक्षिण अमेरिकेमध्ये गटांगळी खाल्ली असली तरी लादेनला जिवंत पकडून अमेरिकेत आणण्यासाठी त्याने ११ वेळा पाकिस्तानचा दौरा केला. टेलिशॉपिंगमधून तलवार खरेदी करून पाकिस्तानच्या मुर्दाड वस्त्यांमध्ये लादेनला शोधण्यासाठी भटकून याने तेथील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये दहशत निर्माण केली. बांधकामांचे कंत्राट घेणाऱ्या एका सामान्य माणसाचा दहशतवादापासून अमेरिकेला वाचविण्यासाठी सुरू असलेला वेडसर वाटावा असा लढा नंतर अमेरिकेतील सर्वच  माध्यमांनी उचलून धरला. डेव्हिड लेटरमन शो, टाइम, जीक्यू मासिक यांच्यापासून सगळ्याच माध्यमांनी हीरो केलेल्या गॅरी फॉकनरच्या लादेनला पकडण्यासाठी झपाटलेल्या अवस्थेचे दर्शन ‘आर्मी ऑफ वन’ या चित्रपटामध्ये विस्ताराने आले आहे.

बोरात, ब्रुनो आणि डिक्टेटर आदींसारखे सांस्कृतिक आणि राजकीय घटकांवर वात्रटविनोद घडवून सिनेमा बनविणाऱ्या लॅरी चार्ल्स दिग्दर्शित ‘आर्मी ऑफ वन’मध्ये ठेवणीतला अक्राळविक्राळ विनोद नाही. तरीही यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे निकलस केज या अभिनेत्याने वठविलेली म्हाताऱ्या नायकाची भूमिका. ‘अजूनही यौवनात मी’चा दांडगा विश्वास या अभिनेत्याला आहे. परिणामी त्याचे अ‍ॅक्शनपट वयाच्या साठीतही खलनायकांसोबतच्या तुल्यहीन हाणामारींचे असतात. ‘आर्मी ऑफ वन’मध्ये निकलस केजने वठविलेला वेडसर छटेचा गॅरी फॉकनर उत्कृष्ट जमला आहे. हावभाव, उच्चरवातील संवाद आणि कमालीची प्रामाणिक व्यक्तिरेखा इथे केज याने वठविली आहे.

चित्रपटाला सुरुवात होते, ती गॅरीचे एका बांधकाम जागेवर फोनच्या आवाजाने भेदरत उठल्याने. सतत अमेरिकेवर नाइन-इलेव्हनसाररख्या हल्ल्यासारखे विमान इमारतीवर कोसळविण्याचा प्रयत्न होतोय का, या भीतीच्या छायेत वावरणाऱ्या गॅरीला अनेक आजार आहेत. त्याचे दोन्ही मूत्रपिंड कमजोर झाल्यामुळे आठवडय़ातून दोन वेळा त्याला रुग्णालयवारी करावी लागते. ती न केल्यास त्याच्या शरीरासोबत मनोवस्थेवरही परिणाम होतो. या अवस्थेतच त्याच्या समोर चक्क देव (कुप्रसिद्ध अभिनेता रसेल ब्रॅण्ड) येतो आणि ओसामा बिन लादेनला जिवंत पकडून आणण्यास मदत करण्याचे आदेश देतो. भणंगासारखे मित्रांच्या साहाय्याने आयुष्य जगणाऱ्या गॅरीसमोर जगण्याचे उद्दिष्ट तयार होते. यात इंधन म्हणून त्याच्या आयुष्यात हायस्कूलमधील मैत्रीण मर्सी (वेण्डी मॅकलंडन कॉव्हे) दाखल होते. त्याचा इस्रायलमधून पाकिस्तानात प्रवेश करण्याचा डाव असफल होतो. त्यानंतर पुन्हा पाकिस्तान गाठण्याचा चंग तो पार पाडतो. तिथल्या रस्त्यांवर लादेनला शोधण्यासाठी तलवार घेऊन फिरतो.

सुपर पॉवर असल्याच्या थाटात गॅरीचे बोलघेवडी धाडस चित्रपटात निकलस केजने अत्यंत चपखल सादर केले आहे. त्याचे आत्मविडंबन करणारे संवाद गमतीदार झाले आहेत. पाकिस्तानमध्ये असलेल्या अमेरिकी गुप्तचर संघटनेचे लुटुपुटुची कागदी लढाई लढणारे अधिकारी  चित्रपटात आहेत. त्यातील एक सिनेमाचे विश्वकोशीय ज्ञान असलेला दाखविण्यात आला आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखा शीर्षकानुसार निकलस केजमुळे उतरंडीकडे जाणाऱ्या आहेत. गॅरीच्या एकलफौजीसाठी तेही महत्त्वाचेच. तरीही सर्वव्यापी देवाच्या भूमिकेमध्ये रसेल ब्रॅण्डला घेऊनही इथे एका विचित्र विनोदाचे टोक गाठण्यात आले आहे.

अमेरिकी सैन्याच्या दहशतवादाविरोधातील कारवाया आणि लादेनला पकडण्यातील अपयश यांचा माध्यमांमध्ये होणारा मारा हा गॅरीची मनोधारणा तयार करणारा आहे. एखाद्या राष्ट्रातील सामान्य व्यक्तीची दहशतवादाबद्दल माध्यमांतून तयार होणारी समज किती मूलतत्त्ववादी बनू शकते, यासाठी गॅरीचे प्रातिनिधिक उदाहरण चित्रपटाने समोर आणले आहे. गॅरी हिंसेच्या आणि दहशतवादाच्या तीव्र विरोधात आहे. त्याला लादेनला जिवंत पकडायचेच आहे. चित्रपटामध्ये लादेन-गॅरी भेट घडविण्याचा एक चमत्कारिक नमुना दिग्दर्शकाने आखला आहे. एकूणच हा चित्रपट माध्यमांनी तयार केलेल्या लादेनविरोधी वातावरणाचा ज्वर दाखविणारा आहे. या दरम्यान पाकिस्तान-अफगाणिस्तानवर आलेल्या अनेक लेख-अभ्यास निबंधांतील वातावरणाला चित्रपट रूप देणारा आहे. दोनेक वर्षांपूर्वी बिल मरे या अभिनेत्याचा अफगाणिस्तानवरील सांगीतिक प्रवासाचा ‘रॉक द कसाबा’ या चित्रपटाप्रमाणे अमेरिकी नागरिकांचे दहशतराष्ट्रांतील दृश्यकुतूहल शमविण्यासाठी तयार केल्या गेलेल्या आर्मी ऑफ वनला वेळशमनाचा साथीदार म्हणून एकदा अनुभवताना मजा येऊ शकेल.