हॉलिवूड अभिनेता अरनॉल्ड श्वार्झनेगर आणि त्यांची पत्नी मारिया श्रीव्हर यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. त्यांनी जवळपास साडे दहा वर्षांनंतर ते विभक्त झाले. आता दोघेही पुन्हा एकदा सिंगल झाले आहेत. मंगळवारी सकाळी लॉस एंजेलिसच्या सुपीरियर कोर्टात यांचा घटस्फोट झाला. घटस्फोट एका खाजगी न्यायाधीशाच्या उपस्थितीत झाला. मंगळवारी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांचा घटस्फोट कायदेशीररित्या झाल्याचे म्हटले आहे.

अरनॉल्ड आणि मारिया यांच्या घटस्फोटाला बराच वेळ लागला, कारण दोघांनाही घाई नव्हती आणि दुसरं म्हणजे त्यांना प्रॉपर्टी सेटलमेंट कराराला खूप वेळ लागला. अरनॉल्ड आणि मारिया खूप आधीपासून वेगळे राहत होते. पण, त्यांच्या नात्यात फारसे बदल झाले नाही आणि दोघेही अनेकदा फॅमिली फंक्शनमध्ये आणि त्यांच्या ४ मुलांसोबत एकत्र दिसले आहेत.

आणखी वाचा : ‘तुमचा धर्म इतरांवर लादणे बंद करा’, उर्फीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

अरनॉल्ड आणि मारिया १० वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. खरं तर, जेव्हा मारियाला कळले की अरनॉल्ड घरी मोलकरणीच्या मुलाचा वडील आहे, तेव्हा ती त्याच्यापासून लांब राहू लागली होती. तो मुलगा जोसेफ बायना हा आता कॉलेजमध्ये शिकत आहे आणि त्याला भविष्यात अभिनेता व्हायचे आहे. जोसेफही त्याचे वडील अरनॉल्डसारखा दिसतो.

आणखी वाचा : सिद्धार्थला एवढ्यात विसरलीस? साखरपुड्यातील शहनाजचा ‘सैराट’ डान्स पाहून आसिम रियाझ संतापला

प्रॉपर्टी सेटलमेंटबद्ल बोलायचे झाले तर, अरनॉल्ड आणि मारिया यांनी याबद्दल कोणालाही सांगितले नाही. अरनॉल्ड आणि मारिया यांची सुमारे ४०० मिलियन डॉलर इतकी अफाट संपत्ती आहे. सुत्रांनुसार, दोघांमध्ये समान विभागणी झाली आहे. अरनॉल्ड आणि मारियाचे लग्न १९८६ मध्ये झाले होते. आता ३५ वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला आहे.