अभिनेता आरोह वेलणकरने त्याच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. आरोह वेलणकरच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. आरोह बाबा झालाय. आरोहने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत त्याच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला असल्याची बातमी दिलीय.
‘इस्टस् ए बॉय’ लिहलेला एक सुंदर फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. ‘येसस्’ असं अगदी लहानसं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं असलं तरी त्याला झालेला मोठा आनंद यात दिसून येतोय. स्पृहा जोशी, सुयश टिळक, गौरी नलावडे अशा बऱ्याचं मराठी कलाकारांनी आरोहचं अभिनंदन केलंय. अनेक चाहत्यांदेखील आरोहची पोस्ट लाईक करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
याआधी आरोहने पत्नीच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ‘आता फक्त दोनच’ महिने उरले असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं होतं. यावरुनच आरोह बाळाची आतुरतेने वाट पाहत असल्याचं लक्षात येतं.
View this post on Instagram
हॉलिवूडची ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री होणार तिसऱ्यांदा आई
आरोह वेलणकर सध्या ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत सौरभची भूमिका साकारतोय. या मालिकेत मिताली मयेकर त्याची सहकलाकार आहे. आरोहने ‘रेगे’ या सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलंय..