अमराठी गायकाने मराठी गाणी गाणे हे काही नवीन नाही. अगदी किशोर कुमारपासून ते सोनू निगमपर्यंत सर्वानीच मराठी चित्रपटांतील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. यात आता अर्पिता चक्रवर्ती या आणखी एक अमराठी गायिकेची भर पडली आहे. अर्पिताने ‘हुतूतू’ या चित्रपटातील ‘लाडीगोडी’ नावाचे क्लब साँग गायले आहे. आनंदराज आनंद यांनी ते संगीतबद्ध केले आहे.
प्रकाश झा दिग्दर्शित ‘सत्याग्रह’ या चित्रपटातील ‘रसके भरे तोरे नैना’ या गाण्याद्वारे अर्पिताने बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. या गाण्यासाठी तिला अनेक नामांकनेही मिळाली पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘रागिणी एमएमएस २’ या चित्रपटातील ‘लोरी ऑफ डेथ’ या गाण्याने. याचदरम्यान अर्पिताला आनंदराज आनंद यांनी मराठी गाण्यासाठी विचारणा केली. तिनेही तात्काळ होकार दिला. ‘लाडीगोडी’ हे क्लब साँग असल्याने शास्त्रीय बाजातील गाणी गाण्याचा अनुभव असलेल्या अर्पिताला ते गाणे अंमळ कठीणच गेले. मात्र, तरीही तिने हे आव्हान स्वीकारले. मुंबईतील काही मराठी मैत्रिणींबरोबर मी याआधीही मराठीतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचाच फायदा गाण्याचे बोल समजण्यात झाल्याचा अर्पिता सांगते. कोणतेही गाणे गाण्याआधी त्याचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे मत ती व्यक्त करते. मराठीसोबतच अर्पिता १६ विविध भाषांमध्ये गाऊ शकते आणि नुकतेच आशिकी २ च्या तेलगू रिमेकमधील एका गाण्यासाठी तिने आपला आवाज दिला आहे.
अर्पिता चक्रवर्तीची मराठीत ‘लाडीगोडी’
अमराठी गायकाने मराठी गाणी गाणे हे काही नवीन नाही. अगदी किशोर कुमारपासून ते सोनू निगमपर्यंत सर्वानीच मराठी चित्रपटांतील गाण्यांना आपला आवाज दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 06-06-2014 at 01:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arpita chakraborty in marathi movie hu tu tu