बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्याविरुद्ध मुझफ्फरनगरमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. संजय लीला भन्साली यांच्या ‘गलियों की रासलीला रामलीला’ या चित्रपटात धार्मिक तेढ निर्माण करणारे दृश्य दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. भन्सालींसोबतच दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा, रणवीर सिंग, निर्माता किशोर लुल्ला आणि चित्रपटाचे संगीतकार आणि गीतकार यांच्याविरोधातही अटक वॉरंट काढण्यात आले आहे.
न्यायालयाचे मुख्य सत्रन्यायाधीश एस. पी. सिंह यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना याबाबतचे आदेश दिले आहे. या सर्वांना अटक करून ४ जूनपर्यंत न्यायालयात हजर करण्याचेही सांगण्यात आले आहे. भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांअंतर्गत तक्रार नोंदवल्यानंतर हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. हिंदू भावांना दुखावणारे प्रसंग या चित्रपटात असल्याचा आरोप करत वकील सुधीर कुमार ओझा यांनी मागील वर्षी तक्रार दाखल केली होती.

Story img Loader