टेलिव्हिजनवरील ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा सूत्रसंचालक कपिल शर्माला दुखापत झाल्यामुळे बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसी या कार्यक्रमाच्या येत्या भागात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या भागाचे चित्रीकरण झाले आहे. या भागात अजय देवगण, श्रिया सारन आणि तब्बू यांनी ‘दृष्यम’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनासाठी हजेरी लावली होती. या सगळ्यांबरोबर चित्रीकरण करताना प्रचंड धम्माल आल्याची प्रतिक्रिया अर्शद वारसी याने ट्विटरवर व्यक्त केली आहे. ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल’मुळे घराघरात लोकप्रिय झालेला कपिल शर्मा सध्या पाठीच्या दुखण्यामुळे बेजार आहे. या त्रासामुळे कपिलला साधारण दोन आठवडे आराम करावा लागणार आहे. त्यामुळेच अर्शद वारसी या कार्यक्रमाचा तात्पुरता सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे.
OMG.. Had an Awesome time with Ajay D, Tabu & Shriya Saran at Comedy Night’s with Kapil. I hosted the show, hope you like it.
— Arshad Warsi (@ArshadWarsi) July 14, 2015
Back in Goa… Can’t get over the fun I had last night at Comedy nights with Kapil…
— Arshad Warsi (@ArshadWarsi) July 14, 2015