बॉलिवूडमध्ये दुखापतीचा सिलसिला सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान शाहरूख खानला दुखापत झाली होती. आता अर्शद वारसीला ‘द लिजण्ड ऑफ मायकल मिश्रा’ चित्रपटाचे शुटींग सुरू असताना डोक्याला दुखापत झाली आहे. याविषयी माहिती देताना अर्शद म्हणाला, चित्रपटातील एका हाणामारीच्या दृष्याच्या वेळी, जेव्हा मी पाठमोरी उडी मारली, तेव्हा कॅमेरा बसवलेल्या लोखंडी ट्रॉलीच्या कोपऱ्यावर माझे डोके जोरात आदळले. डोके एवढे जोरात आदळले की, उपस्थित सर्व लोक धास्तावले. परंतु, अर्शदचे नशिब बलवत्तर! शुटींगस्थळी कर्मचाऱ्यांपैकी कुणीतरी त्या ट्रॉलीवर जाड चादर घातली होती. त्यामुळे मोठ्या दुखापतीपासून अर्शद बचावला.
आधीपासूनच डोकेदुखीमुळे त्रस्त असलेला अर्शद डोकेदुखीची गोळी घेऊन चित्रीकरणाच्या ठिकाणी आला होता. घटनेला दुजोरा देत अर्शद म्हणाला, या अपघातामुळे डोक्याला अतिशय वेदना होत असून, सध्या मी आराम करत आहे. डॉक्टरांनी ‘सीटी स्कॅन’ करण्याचा सल्ला दिला असून, लवकरच मी तो करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा