अभिनेता अरशद वारसीने आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने हिंदी चित्रपट सृष्टीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. जॉली एल.एल.बी, मुन्नाभाई एमबीबीएस, गोलमाल या सारख्या विनोदी चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर असूर या थ्रिलर वेबमालिकेतून त्याने लोकांची उत्सुकता शेवटपर्यंत बांधून ठेवली. चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान अरशदने एबीपी माझाच्या माझा महाकट्ट्यावर दिलखुलास गप्पा केल्या. इच्छा नसतानाही अभिनय क्षेत्रात आपला प्रवेश कसा झाला, ‘तेरे मेरे सपने’ हा पहिला चित्रपट कसा मिळाला याबाबत त्याने भाष्य केले.

मी गोंधळलो

“अभिनेता होण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. उलट चित्रपट क्षेत्रात येण्याची माझी कथाच वेगळी आहे. माझा मित्र जॉय ऑगस्टीन याने एबीसीएल कंपनीसाठी एक चित्रपट दिग्दर्शित करतोय, तू अभिनय करणार का, असे त्याने विचारले. त्यावर हा थट्टा करतोय की काय, असे मला वाटले. मी गोंधळलो. मला अभिनय येत नाही, कसे जमणार. मला भिती वाटत होती. मी अपयशाला घाबरत होतो. मी नाही म्हटले.”, असे अरशदने सांगितले.

bombay hc refuses to direct cbfc to release certification copy to kangana ranaut emergency
Emergency Movie : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर; प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
kangana Ranaut is disappointed after the film Emergency did not get Censor Board certification
हतोत्साहित करणारे, अन्यायकारक! ‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे कंगना राणावत निराश
Kangana Ranaut
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह; सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी म्हणाले, “सर्व समुदायांच्या भावना…”
Mardaani 3 Movie Announcement
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा
What does the Hema committee report say about the casting couch in Malayalam cinema
मल्याळी चित्रपटसृष्टीतही ‘कास्टिंग काऊच’? काय सांगतो न्या. हेमा समिती अहवाल?
Yuvraj Singh Biopic Announced Bhushan Kumar And Ravi Bhagchandka Will Produce
Yuvraj Singh Biopic: वर्ल्डकप हिरो ते कर्करोगावर मात; युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा, मोठ्या पडद्यावर येणार सिक्सर किंगचा प्रेरणादायी प्रवास
Aishwarya Rai Salman Khan in josh
सलमान खान ‘या’ चित्रपटात ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका साकारणार होता, पण…; अभिनेत्रीनेच सांगितलेला किस्सा

फोटोवरून मला रागावतील असे वाटत होते

“जॉयने मला कंपनीला फोटो पाठवायला सांगितले. मी ३६ फोटो एबीसीएलला पाठवले. त्यानंतर मी याबद्दल विसरलो. नंतर मला जया बच्चन यांनी बोलावले. त्या फोटोवरून मला रागावतील असे वाटत होते. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना मी आवडलो. कुठलीही चाचपणी न करता त्यांनी माझी निवड केली. निवड झाल्यानंतर आता मी काय करणार असे मला वाटत होते. चित्रपट झाला, सर्व झाले. मी अभिनय केला. पुढे काही वर्षांनंतर मी जया बच्चन यांना निवडीबद्दल विचारले. तेव्हा जया यांनी म्हटले की, ३६ चा रोल होता, ३६ फोटो होते, ३६ विविध हावभाव होते, तुला कॅमेऱ्याची भिती वाटत नाही, यापेक्षा चांगले गुणवैशिष्ट्य एका अभिनेत्यात असूच शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. जे काम मला मिळत गेले मी ते करत गेलो. तुम्ही चांगले काम केले तर तुम्हाला अजून चांगले काम मिळेल,” असा माझा समज असल्याचे अरशद म्हणाला.

हेही वाचा – मानसी नाईकच्या पूर्वाश्रमीच्या पतीने केला साखरपुडा, रोमँटिक व्हिडीओ चर्चेत; प्रदीप खरेराची होणारी पत्नी कोण? जाणून घ्या

हेही वाचा – परदेशात बहरतंय अक्षरा-अधिपतीचं नातं! हनिमूनमध्ये येणार मोठा ट्विस्ट; फुकेतला पोहोचली दुर्गेश्वरी, पाहा प्रोमो

दहावीनंतर सोडले होते शिक्षण

वडील आणि आईची प्रकृती चांगली नव्हती. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने मी काम करण्याचे ठरवले. फोटोग्राफी लॅबमध्ये काम केले. सेल्समनचे काम केले. नंतर नृत्य गटात सहभागी झालो. पैसे मिळायला लागले, पुढे एका स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व अंतरराष्ट्रीय स्तरावर केले, मी कधी थांबलो नाही, काहीनकाही करत राहिलो. कोरिओग्राफी केली, अशी प्रतिक्रिया अरशदने आपला खडतर प्रवास सांगताना दिली.