रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने जगभरातील लोक विचारात पडले आहेत. महायुद्ध सुरु होणार का असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत. आता या सगळ्यात बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने त्याच्या अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे. अर्शदने सोशल मीडियावर एक मीम शेअर करत जर्मनी-रशिया-युक्रेन-यूएसए या देशांमध्ये सुरु असलेली परिस्थिती कशी असेल ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्शदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे मीम शेअर केलं आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमान या चित्रपटावरं असलेलं हे मीम आहे. हे मीम शेअर करत जर्मनी-रुस-यूक्रेन-अमेरिका-फ्रान्स या देशांची परिस्थिती दाखवली आहे. या मीममध्ये त्याने शर्मन जोशीला अमेरिका, स्वत: युक्रेन, अजय देवगण जर्मनी, तुषार कपूर फ्रान्स आणि गुंड हे रशिया असल्याचे दाखवले आहे. गोलमालचा एक सीन मीममध्ये दाखवला आहे जिथे रिमीला पाहता पाहता गुंडांसमोर अडकतो आणि बाकी सगळे पळून जातात. यात अजय देवगण आणि शर्मन जोशी हे देखील त्याच्यासोबत आहेत. पण जसं समोर त्यांना गुंड दिसतात आणि ते आता कर्ज मागणार हे त्यांच्या लक्षात येतं ते पळून जातात, पण अर्शद गुंडांच्या जाळ्यात अडकतो. हे मीम शेअर करत ‘गोलमाल हा काळाच्या खूप पुढे होता, हे यावरून कळतंय’, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : ‘यांना थोडा शिष्टाचार शिकवा…’ एअर हॉस्टेसच्या वागणुकीवर संतापली अभिनेत्री

आणखी वाचा : “मलाच सगळं करावं लागत अन् माझ्या भावाला….”; अमिताभ बच्चन यांच्या नातीने घरात होणाऱ्या भेदभावावर केले होते वक्तव्य

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने जगभरात सगळ्यांना युद्धाची भीती वाटते. संपूर्ण जगावर असलेल्या या संकटावर सर्वांचे लक्ष लागले आहेत. तर रशियाकडून युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरु होताच युक्रेनमधील नागरिक राजधानी कीव सोडून बाहेर पडत असून रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arshad warsi shared meme on russia ukraine crisis from golmal movie dcp