रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने जगभरातील लोक विचारात पडले आहेत. महायुद्ध सुरु होणार का असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत. आता या सगळ्यात बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने त्याच्या अंदाजात प्रतिक्रिया दिली होती. अर्शदने सोशल मीडियावर एक मीम शेअर करत जर्मनी-रशिया-युक्रेन-यूएसए या देशांमध्ये सुरु असलेली परिस्थिती कशी असेल ते दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

अर्शदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे मीम शेअर केले होते. रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमान या चित्रपटावरं असलेलं हे मीम आहे. हे मीम शेअर करत जर्मनी-रुस-यूक्रेन-अमेरिका-फ्रान्स या देशांची परिस्थिती दाखवली आहे. या मीममध्ये त्याने शर्मन जोशीला अमेरिका, स्वत: युक्रेन, अजय देवगण जर्मनी, तुषार कपूर फ्रान्स आणि गुंड हे रशिया असल्याचे दाखवले आहे. गोलमालचा एक सीन मीममध्ये दाखवला आहे जिथे रिमीला पाहता पाहता गुंडांसमोर अडकतो आणि बाकी सगळे पळून जातात. यात अजय देवगण आणि शर्मन जोशी हे देखील त्याच्यासोबत आहेत. पण जसं समोर त्यांना गुंड दिसतात आणि ते आता कर्ज मागणार हे त्यांच्या लक्षात येतं ते पळून जातात, पण अर्शद गुंडांच्या जाळ्यात अडकतो, असे त्या मीममध्ये दाखवण्यात आले होते.

Drunk Russian Woman tourist accident Raipur
मद्यधुंद रशियन महिला मांडीवर बसली आणि चालकाचं नियंत्रण सुटलं, दुचाकीला धडक बसताच महिलेनं घातला गोंधळ
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Finance Ministry
Finance Ministry : वित्तमंत्रालयातील कर्मचाऱ्यांना चॅट जीपीटी, डीपसीक आदी AI च्या वापरास मज्जाव, कारण काय?
Police seize Rs 6 to 7 crore worth of cash from Rajkamal Laundry in Indira Nagar Tumsar
भंडारा: खळबळजनक! लॉन्ड्रीतून मिळाले ७ कोटी; रक्कम कुणाची?
Viral video young boy sitting on railway track while talking phone video goes viral social Media
जीव एवढा स्वस्त असतो का? रेल्वे रुळावर फोनवर बोलत बसला; समोरुन ट्रेन आली अन्…VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Navri Mile Hitlarla
‘नवरी मिळे हिटलरला’मधील लक्ष्मी व सरस्वतीने शेअर केला व्हिडीओ; सहकलाकारांच्या कमेंट्सने वेधले लक्ष
Navri Mile Hitlarla
Video: एकीकडे यश-रेवतीची लगीनघाई तर दुसरीकडे लीलाच्या जीवाला धोका? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये नेमकं काय घडणार
टोरेस प्रकरणात युक्रेनच्या नागरिकाला आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक, परदेशी आरोपींना मुंबईत प्रस्थापित करण्यात आरोपीची मदत

आणखी वाचा : “मलाच सगळं करावं लागत अन् माझ्या भावाला….”; अमिताभ बच्चन यांच्या नातीने घरात होणाऱ्या भेदभावावर केले होते वक्तव्य

आणखी वाचा : “२ नाही ४ पेन किलर घ्याव्या लागल्या…”, आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाची केआरकेने उडवली खिल्ली

त्याचे हे मीम पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, “मला विनोद कळला… संदर्भ बरोबर आहे..पण अशा परिस्थितीत असे विनोद करायला नको. तिथे कुठेतरी युद्ध सुरु आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “मूर्खपणाची हद्द पार झाली आहे. संकटाच्या परिस्थितीत कोणीतरी अशा गोष्टीचा विचार किंवा सोशल मीडियावर शेअर कसं करू शकतं?” तिसरा नेटकरी म्हणाला, “युक्रेनमध्ये लोकांना त्रास होत आहे आणि तुम्ही त्यातून एक मीम बनवलं. तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती.” आणखी एक नेटकरी ट्रोल करत म्हणाला, “लोक मरत आहेत आणि तुम्ही विनोद करत आहात”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अर्शदला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने जगभरात सगळ्यांना युद्धाची भीती वाटते. संपूर्ण जगावर असलेल्या या संकटावर सर्वांचे लक्ष लागले आहेत. तर रशियाकडून युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरु होताच युक्रेनमधील नागरिक राजधानी कीव सोडून बाहेर पडत असून रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Story img Loader