हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान आणि अर्सलन गोणी गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. ते दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. दरम्यान, आता लवकरच सुझान आणि अर्सलन लग्न करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. आता या प्रकरणात कितपत तथ्य आहे, याचा खुलासा स्वतः अर्सलन गोणीने केला आहे.
नुकतंच ‘हिंदुस्तान टाइम्स’शी संवाद साधताना अर्सलनला याबद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा अर्सलनने हसत हसत या मुद्द्यावर भाष्य केले आहे. यावेळी तो म्हणाला, “मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही बोलायचे नाही. या बातमीची सुरुवात कुठून झाली आणि या गोष्टी बातमी पसरवणाऱ्यांना कुठून कळल्या याबद्दल मला माहिती नाही. तसेच आम्ही लवकरच लग्न करणार आहोत हा निर्णय कोणी घेतला, कधी घेतला हे मलाही जाणून घ्यायचे आहे.”
‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा, पोस्ट शेअर करत विकी कौशल म्हणाला…
अर्सलन पुढे म्हणाला, “माझे वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य चांगले चालले आहे. कोणालाही माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत उत्तरं द्यायला मी बांधिल नाही. मला माझे आयुष्य जगाला दाखवायचे नाही. जरी मी अभिनेता असलो तरी मला माझं वैयक्तिक आहे. मला त्याचे प्रदर्शन मांडायचे नाही. सध्या मला माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. मी माझ्या आगामी प्रकल्पाबद्दल फार उत्सुक आहे.”
दरम्यान हे सर्व बोलत असताना अर्सलन गोणीने सुझानसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्यांवर होकार दिलेला नाही आणि स्पष्ट नकारही दर्शवलेला नाही. त्यामुळे ते दोघेही इतक्यात विवाहबंधनात अडकणार का? याबद्दल काहीच स्पष्ट होत नसल्याचे दिसत आहे. सुझान अनेकदा सोशल मीडियावर अर्सलनसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दोघंही आपलं आयुष्य मोकळेपणानं जगत आहेत आणि त्यांनी आपलं नातं काही महिन्यांपूर्वी जगासमोर मांडलं आहे.
दरम्यान हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. पण मुलांसाठी ते दोघे नेहमी एकत्र येताना दिसतात. सध्या सुझान अर्सलनला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. अर्सलन अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसला होता. यात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.