अभिनेता हृतिक रोशनची पूर्वश्रमीची पत्नी सुझान खान मागच्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. सुझान खान अभिनेता अली गोनीचा भाऊ अर्सलान गोनीसोबत रिलेशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. या दोघांचे डिनर डेट तसेच मित्रांसोबतच्या पार्टीतले फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या सर्व गोष्टींवर सुझान किंवा अर्सलान यापैकी कोणीच प्रतिक्रिया दिली नव्हती पण आता अर्सलाननं सुझानसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

अलिकडेच सुझान खाननं कोविड चाचणी पॉझिटिव आल्याची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. यावर अर्सलानची कमेंट पाहिल्यावर अनेकांनी हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्सलान म्हणाला, ‘जर एखाद्या व्यक्तीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर मी त्यांना काय सांगायला हवं. मी अर्थातच त्यांच्या लवकर ठीक होण्याची प्रार्थना करेन.’

rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

सुझानसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अर्सलान म्हणाला, ‘लोक काय बोलतात याकडे मी लक्ष देत नाही. सर्वांना बोलण्याचा हक्क आहे. पण जर एखाद्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर मी त्या व्यक्तीशी प्रेमानेच बोलेन. सुझानसोबतच्या नात्याबाबात जाहीरपणे बोलणं मला अजिबात आवडत नाही. मी अशा गोष्टींवर बोलणं शक्यतो टाळतो. अशाप्रकारच्या अफवांबद्दल माझे मित्र मला सांगत असतात. बातम्याही फॉरवर्ड करत असतात. दोन माणसं एक आनंदी आयुष्य जगत आहेत. बस्स आणखी काय हवं.’

हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. पण मुलांसाठी ते दोघे नेहमी एकत्र येताना दिसतात. सध्या सुझान अर्सलनला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. अर्सलन अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसला होता. यात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.

Story img Loader