पंकज भोसले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
फेसबुकोत्तर काळाने एका पिढीला अकाली स्मरणरंजनाची शिदोरी उघडून ठेवली. परिणामी आज जेमतेम विशी आणि तिशीत असणारी मुले मागील पिढीसारखी ‘लहानपणीच्या आठवणी’ वगैरे या माध्यमाच्या व्यासपीठावर ओतत राहतात. एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात जन्मलेल्या मुला-मुलींनी केबल टीव्ही-इंटरनेट-मोबाइल-सोशल मीडिया-आयपॉड-आयपॅड या गोष्टी नसलेल्या काळातील संथ आणि शांत जगण्याचाही आस्वाद घेतला आणि पुढे या सगळ्याशी एकरूप झाल्यानंतर काहीच वर्षांत या कोलाहलातून बाहेर पडत समाजमाध्यमबाह्य़ जगण्याचाही प्रयत्न केला. (आज मोबाइल आणि समाजमाध्यमांचा फोलपणा उमजणारी पिढी यापासून लांब जाण्यासाठीच धडपडताना दिसते.) साहित्य आणि चित्रपटांमध्ये आज तिशी- चाळिशीतल्या कलावंतांकडून होणारे कलाकृतीयुक्त स्मरणरंजन महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी ठरण्यामागे नव्वदोत्तरी आणि नव्वदीतील जगण्यामध्ये पडलेला आफाट फरक आहे.
केवळ भारतीय पटलावर विचार केला, तर नव्वद-पंच्याण्णव सालापर्यंत शहर-उपनगरे आणि शहरगावांमध्ये मध्यमवर्गीय घरांमध्ये टीव्हीच्या दोन वाहिन्या आणि रेडिओपलीकडे मनोरंजन साधनांचा अभाव होता. वाचनालयांमधील ग्रंथ वाचकांचा तेव्हाही तुलनेत कमी असला तरी हक्काचा वर्ग होता. पुस्तक व्यवहार आजइतका आक्रसला नव्हता आणि सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सवांमध्ये आजइतका चकमकाट नव्हता. हिंदी चित्रपटांमधील नाक चोंदल्यासारखे वाटणाऱ्या गायकाच्या प्रेमगाण्यांची सद्दी होती आणि परदेशातील आकर्षक दृश्यांसह चालणारे लग्नहोत्राचे संस्कारछाप सिनेमे डोळ्यांत पाणी आणून पाहिले जात होते. टेपरेकॉर्डरवर ‘घटॅव घटॅव’ होईस्तोवर चालविल्या जाणाऱ्या ऑडिओ कॅसेट्स पौगंडावस्थेतील मुला-मुलींच्या जगण्याचा एक भाग होत्या. ‘पॉकिटमनी’च्या बाबत अतिकफल्लक असलेल्या या काळातील मुलांना आपल्या मर्यादित भवतालाच्या वकुबानुसार बिघडण्याची वा घडण्याची मुभा होती.
हा मुद्दा तपशिलात देण्यामागचे कारण लेखक-दिग्दर्शकाच्या भूमिकेत पहिल्यांदाच बसलेल्या जोना हील या हॉलीवूड अभिनेत्याच्या ‘मिड नाइंटीज’ नावाच्या सिनेमातील काळ आणि मुलांचे जगणे हे आपल्याकडच्या त्या काळातील मुलांशी बरेचसे समांतर जाणारे आहे. माहितीपटासारखा तोंडवळा घेऊन समोर येणारा ‘मिड नाइंटीज’ गतवर्षांच्या अखेरीस आलेल्या उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. त्याच्यात स्मरणरंजनाचा उसना आव नाही, मात्र नव्वदीचे दशक पकडताना लॉस एन्जेलिसमधील विशिष्ट भागात जगणाऱ्या तरुणाईच्या जगण्याच्या नोंदी आहेत. जोना हील या अभिनेत्याच्या वैयक्तिक अनुभवांशी निगडित असलेला हा भाग आजच्या वायुवेगात जगणाऱ्या कलाकारांकडून उभा करण्यात तो पूर्णपणे यशस्वी झाला आहे. कमिंगएज सिनेमांच्या धारदार आणि हुकमी मनोरंजनाच्या मोहात न पडता हा गंभीर सिनेमा त्या काळाला घट्ट धरत एक सुंदर गोष्ट मांडतो.
‘मिड नाइंटीज’मधला नायक आहे स्टीव्ही (सनी सॉल्जिक) हा लॉस एन्जेलिसजवळच्या शहरखेडय़ात राहणारा तेरा वर्षीय मुलगा. फारशा श्रीमंत नसलेल्या घरात आई आणि भावासोबत राहत असलेल्या स्टीव्हीमध्ये बंडखोरीची शिंगं फुटण्यासाठी पोषक परिस्थिती तयार झालेली असते. आपल्या व्यायामपटू आणि एकलकोंडय़ा राहणाऱ्या भावाशी हाणामारीत कायम पराभूत होणाऱ्या स्टीव्हीची तातडीची गरज आणि महत्त्वाकांक्षा अल्पावधीत मोठे होण्याची असल्याने त्यासाठीची त्याची धडपड सिनेमाच्या आरंभापासून स्पष्ट व्हायला लागते. मोठा भाऊ घरात नसताना त्याच्या खोलीची तपासणी करून तो वाचत असलेली पुस्तके, मासिके, पाहत असलेले सिनेमे-ऐकत असलेली गाणी यांची यादी करून ‘मोठे होण्यासाठी’चे त्याचे पहिले पाऊल पडते. पुढे लवकरच घराजवळील परिसरामध्ये स्केटबोर्डवर लीलया फिरणाऱ्या त्याच्याहून बऱ्याच मोठय़ा मुलांचा ताफा त्याचे आकर्षणाचे केंद्र ठरते. या उंडग्या मुलांचे बिनधास्त जगणे, मौज-मजा करणे, अद्भुतरीत्या स्केटबोर्डवर कारागिरी करणे, शिवराळ भाषा वापरणे त्याला आवडायला लागते. भावाकडून वस्तुविनिमय पद्धतीने स्केटबोर्ड हस्तगत करून तो उंडग्या मुलांशी मैत्री करण्यात यशस्वी होतो. ‘फकशीट’, ‘फोर्थग्रेड’, ‘सनबर्न’ अशा नावांच्या या शहराने ओवाळून टाकलेल्या मुलांचे आपापल्या घरातील व्यक्तींऐवजी स्केटबोर्डशी असलेले गहिरे नाते पाहून भारावून गेलेला स्टीव्ही अल्पावधीतच त्यांच्यातलाच एक बनून जातो.
स्केटबोर्डच्या एका धाडसी मोहिमेत जखमी झाल्यानंतर स्टीव्हीच्या या नव्या संगतीची माहिती झालेली त्याची आई साऱ्या उंडग्या मुलांना स्टीव्हीपासून लांब राहण्याचा सल्ला देते. मात्र त्याचा उलटच परिणाम होतो. स्केटबोर्डर्सच्या ताफ्याशी असलेले स्टीव्हीचे नाते आणखी वाढायला लागते. शाळा आणि घर सोडून या मुलांच्यातच राहण्याची त्याची तयारी होते. स्टीव्हीच्या माध्यमातून एका शहरातील स्केटबोर्ड चालविणाऱ्या विस्तृत जगाचे दर्शन या चित्रपटामध्ये करून देण्यात आले आहे. या ताफ्यातील सर्वोत्तम खेळाडू रे हा स्टीव्हीचा मित्र बनतो आणि त्याच्या बंडखोरीला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तरी गोष्टी न रोखण्याइतपत टोकालाच जाऊ पाहतात. ज्यातून लहान वयातच स्टीव्हीला अपेक्षित असलेला मोठेपणा मात्र प्राप्त होतो.
आजच्या तरुणाईभोवती असलेली शेकडो साधने, व्यवधानांची थोडीही शक्यता नसलेला काळ आपल्या स्मरणरंजित गोष्टीद्वारे उभा करणे हा चित्रपटाचा हेतू आहे. अमेरिकी दिग्दर्शक लॅरी क्लार्क यांच्या ‘किड्स’ आणि ब्रिटिश दिग्दर्शक शेन मेडोज यांच्या ‘दिस इज इंग्लंड’ या दोन सिनेमांचा या चित्रपटावर मोठा प्रभाव आहे. मात्र परिणामाच्या दृष्टीने विचार करायचा झाला, तर आजच्या फॉम्र्युलेबाज कमिंगएज सिनेमांपेक्षा हा अधिक लक्षांत राहणारा सिनेमा ठरू शकेल.