भक्ती परब
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुलांच्या वाढदिवसाला केक कसा असावा?, हे आपण त्यांना विचारतो. वाढदिवसाचा केक खास असावा, याबद्दलच्या काही कल्पना त्यांच्याही डोक्यात असतात. लहान मुलं म्हणजे निरागसतेचं आणि कल्पकतेचं भांडार. कधी कसला केक मागतील सांगता येत नाही. कुणाला त्यांच्या आवडत्या खेळण्यांच्या आकारासारखा केक हवा असतो तर कुणाला त्यांच्या आवडत्या कार्टूनसारखा. कधी केकवर परी वगैरे हवी असते, तर कधी केकवर फुलांची नक्षी अशा नाना तऱ्हा. पण यामुळेच ‘बेस्ट केक विन्स’ नावाचा कार्यक्रम पाहताना गंमत आणि रंजकता टिकून राहते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलाला त्याच्या वाढदिवसाला केक कसा हवाय?, ते विचारलं जातं. मग केक बनवणाऱ्या दोन शेफमध्ये स्पर्धा लागते ती त्या त्या मुलाला हवा तसा केक बनवून देण्याची. मग त्या दोन शेफमधील कोण जिंकेल आणि मुलाला कुठला केक आवडेल हे समजून घ्यायचं तर कार्यक्रम पाहायलाच हवा. अशा भन्नाट कल्पनांवर आधारित एकाहून एक सरस कार्यक्रम माहितीपर आणि जीवनशैलीविषयक वाहिन्यांवर सुरू असतात.
* भन्नाट कल्पनांच्या या कार्यक्रमांचा ठरलेला असा वेळ नाही. कधी मधूनच अशा वाहिन्या पाहायच्या म्हटल्या तर यावर पुन:प्रसारित कार्यक्रमही बऱ्याचदा सुरू असतात. अशा वेळी या वाहिन्यांनी कुठला कार्यक्रम कधी हे प्रोग्राम गाइडमध्ये निश्चित केले तर प्रेक्षकसंख्या वाढू शकते. पण काही कार्यक्रम आणि माहितीपर लघुपट या वाहिन्यांवर असे दाखवले जातात की पुन्हा पाहिले तरी हरकत नसावी. ‘हिस्ट्री टीव्ही १८’ आणि ‘एफवायआय टीव्ही १८’ या वाहिन्यांवरील कार्यक्रमांची बरीच चर्चा होते. ‘हिस्ट्री टीव्ही १८’ वर ‘मुंबई द सिटी ऑफ गणेशा’ नावाच्या माहितीपटाचे प्रोमो झळकत आहेत. मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या गणेशाचं मुंबईशी असलेलं नातं यात उलगडण्यात येणार आहे. एखाद्या भव्य-दिव्य चित्रपटाच्या ट्रेलरसारखे हे प्रोमो प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहेत. त्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, मनीष पॉल यांसारखे कलाकार ‘गणपती आणि मुंबई’ या नात्याविषयी बोलताना दिसतात. या माहितीपटाचं छायाचित्रणही डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे. याशिवाय, सध्या या वाहिनीवरचे स्पेशल ऑपरेशन्स, फायर पॉवर यांसारखे वेगवेगळे कार्यक्रम प्रेक्षकांना भुरळ घालतायेत. ‘ओएमजी, ये मेरा इंडिया है’ हा कार्यक्रमही लोकप्रिय ठरलाय. सामान्य माणसाचं असामान्य कर्तृत्व किंवा एखादी जगावेगळी कला असलेल्या माणसाचं विश्व यात उलगडलं जातं.
* इच्छेप्रमाणे केक बनवून घेणाऱ्या मुलांची गोष्ट आणि इतर हटके कार्यक्रम देणारी ‘एफवायआय टीव्ही १८’ ही वाहिनीसुद्धा तितकीच पाहिली जाते. ‘कार्निवल इट्स’, ‘एक्स्ट्रीम केक मेकर्स’, ‘बेस्ट केक विन्स’, ‘टायनी हाऊस हंटिंग’ (पर्व दुसरे), ‘स्मॉल बजेट बिग मेकओव्हर’ यांसारखे कार्यक्रम प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. प्रत्यक्ष प्रेक्षकांनाही यात सहभागी होता येत असल्यामुळे सोने पे सुहागा. ‘स्मॉल बजेट बिग मेकओव्हर’ हाही असा भन्नाट कार्यक्रम. आपल्या प्रत्येकाच्या घराविषयी आणि घर सजवण्याविषयी काही कल्पना असतात. काहींच्या त्या प्रत्यक्षात येतात, काहींच्या येत नाहीत, काही प्रयत्न करतात.. तर अशा मंडळींसाठी हा कार्यक्रम म्हणजे पर्वणीच. यात मणिंदर आणि विशाखा हे दोघे आर्किटेक्ट आपल्या स्वप्नातलं घर प्रत्यक्षात साकार करून देण्याचं आश्वासन देतात आणि कार्यक्रमाच्या शेवटी ते पुरं करतात. आपण फक्त त्यांना आपलं बजेट सांगायचं. आता येणाऱ्या भागात पारेख कुटुंबात विदेशी सूनबाई येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी त्यांना त्यांच्या घराला आधुनिक लुक द्यायचा आहे. बेकिंगची आवड असलेल्या सूनबाईंना त्या घरात बेकिंगसाठी खास जागाही हवी आहे, अशा गरजा लक्षात घेऊन मणिंदर आणि विशाखा हे दोघे त्यांचं घर सजवण्याचा विडा उचलणार आहेत. हे पाहायला धम्माल नक्की येणार, कारण बजेट काय असणार आणि मणिंदर – विशाखाने केलेला बिग मेकओव्हर पारेख कुटुंबीयांना आणि खास करून त्यांच्या नव्या सूनबाईला आवडतो की नाही, ही गंमत आहे.
* घराइतकंच आपल्याला प्रिय असतं संगीत. प्रत्येकाची खास अशी गाण्यांची आवड असते. पण या वेळी शेरोशायरी आणि कैफी आझमींचे तुम्ही चाहते असाल तर त्यांची शायरी, नज्म, गझला आणि हिंदी चित्रपटगीतं पाहण्याची संधी डीडी नॅशनलवर मिळणार आहे. कैफी आझमी यांची मुलगी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आपल्या अब्बांच्या स्मृतींमध्ये रमून ‘रंगोली’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. हा विशेष भाग रविवारी सकाळी ८ वाजता पाहायला मिळणार आहे. एकीकडे माहितीपूर्ण मनोरंजनाची रेलचेल पुढच्या आठवडय़ात असताना आपल्या नेहमीच्या मनोरंजनविश्वातही मोठी खळबळ आहे. त्याक डेही लक्ष द्यायला हवं.
* ‘तीच वेळ, पण नव्या भीतीचं नवं काहूर’ माजवायला ‘रात्रीस खेळ चाले’चं दुसरं पर्व सोमवारपासून सुरू होतंय. पुन्हा एकदा पांडू, अण्णा, माधव अशा सगळ्या इरसाल व्यक्तिरेखा आपल्याला आता भेटतील. या मालिकेची जशी आपल्या मनात खास जागा आहे, तसेच काही लोकप्रिय कलाकार छोटय़ा पडद्यावर दाखल झाले की ते कायम चर्चेत असतात. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुयश टिळक आणि आस्ताद काळे हे दोघे अनुक्रमे ‘छोटी मालकीण’ आणि ‘नकळत सारे घडले’ या दोन मालिकांमध्ये खास वळणावर प्रवेश करणार आहेत. त्यामुळे रंजकता अंमळ वाढणार हे नक्की. तर ‘छोटे सूर वीर’ या कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल उपस्थित राहणार आहेत. या वेळी हर्षद म्हणजेच मॉनिटर लखन बनून गाणं सादर करणार आहे.
* छोटय़ा पडद्याची गंमतच ही आहे की नव्या कलाकारांना आणि चर्चेत नसलेल्या कलाकारांनाही एकत्र जोडतो. सांगीतिक, नृत्याचे किंवा अन्य टॅलेंट हंटचे कार्यक्रम सादर होतात तेव्हा विशेष उपस्थिती म्हणून किंवा परीक्षकांच्या रूपात अनेक मान्यवर मंडळी सहभागी होतात. त्यानिमित्ताने सुवर्णाकित भूतकाळ, रुपेरी वर्तमानकाळ हातात हात घालून उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज होतो. त्या वेळी छोटय़ा पडद्याच्या सर्वसमावेशक माध्यमाच्या ताकदीचा प्रत्यय येतो.