रेश्मा राईकवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बॉलीवूडसाठी यंदाचं वर्षही हिट्सच्या गणितात मार खाणारेच ठरले आहे. अनवट विषय घेऊन आलेल्या काही निवडक चित्रपटांनी अनपेक्षितरीत्या तिकीटबारीवर कमाई केली असली तरी बॉलीवूड अजूनही दणदणीत यशाच्या प्रतीक्षेत आहे. एकीकडे प्रदर्शनासाठी चित्रपटांची लागलेली लांबचलांब रांग आणि त्या तुलनेत तिकीटबारीच्या गल्ल्यावरचा खडखडाट असे विरोधी चित्रच अजूनही पहायाला मिळते आहे. नेहमीच्या हिंदी चित्रपटांपेक्षा मधून मधून येणारे हॉलीवूडपट तिकीटबारीवर चांगला गल्ला कमावतात, हे चित्र अगदी याही महिन्यात पाहायला मिळाले आहे. पुढच्या दोन महिन्यांत केवळ हिंदीतच २६ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात अजून मराठी आणि अन्य प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचीही भर पडणार आहे. मात्र त्यातील कमाई करणारे चित्रपट नेमके किती?, असा हिशोब करायचा ठरवला तर हे गणित तीन ते चार चित्रपटांच्या पुढे जात नाही.

या वर्षी जुलैपासून प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा विचार केला तरी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित झालेला ‘स्त्री’ हा एकमेव आणि खऱ्या अर्थाने तिकीटबारीवर सुपरहिट ठरलेला चित्रपट आहे, असे म्हणता येईल. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या स्त्री या हॉरर-कॉमेडी चित्रपटाविषयीही प्रेक्षकांना सुरुवातीला फारशी खात्री नव्हती. मात्र दिनेश व्हिजन दिग्दर्शित या चित्रपटाने लोकांची मनं जिंकली. केवळ तोंडी प्रसिद्धीच्या जोरावर संपूर्ण सप्टेंबर महिना हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये ठाण मांडून होता. आतापर्यंत या चित्रपटाने १२९.६७ कोटी रुपयांची कमाई करत सुपरहिटचा लौकिक मिळवला आहे. त्याआधी फक्त १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या गोल्ड चित्रपटालाच शंभर कोटी रुपयांची सीमारेषा पार करता आली होती. त्यानंतर अजूनही तिकीटबारीवर हिटची प्रतीक्षा सुरूच आहे. अगदी जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते या चित्रपटालाही ८९ कोटींच्या पुढे जाता आलेले नाही. तर यशराज प्रॉडक्शनचा चित्रपट असून आणि वरुण धवन-अनुष्का शर्मा ही जोडी असतानाही हा चित्रपट अजून शंभर कोटींच्या अलीकडेच रेंगाळतो आहे. एकीकडे तिकीटबारीवर ढेपाळणारे मोठमोठे चित्रपट आणि दुसरीकडे पुढच्या दोन महिन्यांत प्रदर्शनासाठी ताटकळलेल्या चित्रपटांची यादी अशा विरोधाभासातूनच हे वर्ष पुढे सरकते आहे. प्रेक्षकांचा कल बिग बजेट चित्रपटांकडे आहे, असे म्हणावे तर याच कालावधीत प्रदर्शित झालेल्या दोन हॉलीवूडपटांनी चांगलीच कमाई केली आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या द नन या हॉलीवूडपटाने आतापर्यंत ४२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दोन आठवडय़ांपूर्वी प्रदíशत झालेल्या व्हेनॉम या सुपरहिरो हॉलीवूडपटानेही अगदी थोडय़ा दिवसांत २८ कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. हॉलीवूडपटांना गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय तरीही हॉररपट म्हणून द ननला मिळालेले यश बाजूला ठेवले तरी व्हेनॉम हा गाजलेला सुपरिहरो नसतानाही त्याला मिळालेला प्रेक्षक प्रतिसाद कोडय़ात टाकणाराच आहे. बत्ती गुल मीटर चालू, मनमर्जिया, मंटो, पलटन, पटाखा, लवयात्री, हेलिकॉप्टर ईला आणि आता नमस्ते इंग्लंड असे छोटे-मोठे सगळेच चित्रपट तिकीटबारीवर आपटले आहेत. त्यातल्या त्यात आयुषमान खुराणा-तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेला श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधून’ला ५० कोटी वरून रुपयांपर्यंत पोहोचता आले आहे. तर आयुषमानच्याच ‘बधाई हो’ चित्रपटाला सध्या प्रेक्षकपसंती मिळाली असल्याने त्याची कमाई चांगली असल्याने कमी बजेट चित्रपट असूनही पहिल्याच दिवशी चित्रपटाने तब्बल ७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. याही चित्रपटाला तोंडी प्रसिद्धीनेच तिकीटबारीवर कमाई करता येईल, असा ट्रेड विश्लेषकांचा अंदाज आहे. या सगळ्या नकारी पार्श्वभूमीवर या आठवडय़ात हिंदीतील ८ चित्रपट प्रदर्शित होतायेत. ज्यात केवळ एका चित्रपटाचीच सध्या चर्चा आहे तो म्हणजे निखिल अडवाणी याची निर्मिती असलेला आणि सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेला बाजार. एकाच दिवशी अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याचा हा सिलसिला डिसेंबपर्यंत कायम राहणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात दिवाळी असल्याने त्या वेळी या वर्षांतला बहुचर्चित असा बिग बजेट चित्रपट ठग्ज ऑफ हिंदुस्थान प्रदर्शित होणार आहे. त्या वेळी इतर कुठलेही हिंदी चित्रपट नसतील. म्हणून त्याआधीच्या आठवडय़ातच ५ हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यानंतर मात्र नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा २.० हा चित्रपट प्रदर्शित होईल. डिसेंबर महिन्यात तर लागोपाठ चांगल्या चित्रपटांचीही रांग लागली आहे. टोटल धम्माल, मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर आणि अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर (हे दोन्ही वेगवेगळे चित्रपट आहेत), शाहरूख खानचा झिरो आणि शेवटी रणवीर सिंगचा सिम्बा असे चित्रपटांचे कॅलेंडर खच्चून भरलेले आहे. त्यात मराठीतील चांगल्या चित्रपटांचीही यादी तितकीच मोठी आहे. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, मुळशी पॅटर्न, मुंबई पुणे मुंबई, गॅटमॅट, नाळ, एक सांगायचंय.. अनसेड हार्मनी आणि माझा अगडबम असे मराठी चित्रपटही या दोन महिन्यांत प्रदर्शित होणार आहेत. पुढच्या दोन महिन्यांत दिवाळी आणि ख्रिसमस हे सण, त्यानिमित्ताने येणाऱ्या सुट्टय़ा यांचा हिशोब लक्षात घेतला तरी प्रेक्षक यापैकी नक्की कोणकोणते चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करणार?, हा प्रश्न उरतोच. मोठय़ांशी कमीतकमी स्पर्धा करत आपला चित्रपट चालावा यासाठी सगळ्याच पातळीवर निर्मात्यांची धामधूम सुरू आहे. मात्र सध्या तरी तिकीटबारीवरच्या या गर्दीत कोणते चित्रपट बॉलीवूडच नव्हे तर चित्रपट उद्योगासाठी फायदेशीर ठरतील हे पाहणे रंजक ठरणार आहे.