छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत – वाचत महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती लहानाची मोठी झाली आहे. परकीय सत्तेसमोर निर्भीडपणे उभे राहून स्वराज निर्माण करण्याचे स्वप्न शिवाजी महाराजांनी पहिले. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोंडाजी र्फजद, बाजी प्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे यांसारख्या अनेक वीर मावळय़ांनी त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत शिवाजी महाराजांची साथ दिली. शिवाजी महाराजांचा हा इतिहास चित्रपटरूपात प्रेक्षकांना दाखवण्याचा निर्धार केलेल्या दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘श्री शिवराज अष्टक’ ही चित्रपट श्रुंखला प्रदर्शित करण्याचे ठरवले. या ‘श्री शिवराज अष्टका’तील ‘र्फजद’, ‘फतेशिकस्त’, ‘शेर शिवराय’ आणि ‘पावनिखड’ हे चार चित्रपट प्रदर्शित झाले असून आता लवकरच या अष्टकातील पाचवा चित्रपट ‘सुभेदार- गड आला पण..’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा