रवींद्र पाथरे

‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ अशी एक म्हण आहे आपल्याकडे. सगळी दु:खं, व्याप-ताप काय ते आपल्याच वाटय़ाला आलेत, दुसऱ्यांना काय कळणार आपलं दु:ख, असंच प्रत्येक माणसाला वाटत असतं. खरं तर चिंता, दु:ख, अपमान, वंचना, व्याप-ताप या गोष्टी कुणालाच चुकलेल्या नाहीत. गरीब, श्रीमंत, राजे, रंक अशा सगळ्यांनाच आपल्या आपल्या म्हणून काही विवंचना असतातच. त्यात थोडासा तर-तम भाव असेल कदाचित; पण त्या असतातच. दुसऱ्याच्या व्यथा-वेदना समजून घ्यायच्या तर परकायाप्रवेश हाच एकमेव मार्ग. तो लेखक-कलावंत मंडळींनाच जमू जाणे. अष्टविनायक निर्मित, चिन्मय मांडलेकर लिखित-दिग्दर्शित ‘व्हॅक्युम क्लीनर’ हे नाटक हेच वास्तव फॅन्टसीच्या रूपात मांडतं.

Pimpri, entrepreneur , LBT ,
पिंपरी : उद्योजकांमागे ‘एलबीटी’चे शुक्लकाष्ट, महापालिकेकडून ७२ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Success story of kamal khushlani owner of mufti jeans once borrowed money now owning crores business
फक्त १० हजार रुपयांच्या कर्जाने सुरू केलं काम, आता आहे कोटींचं साम्राज्य; वाचा कोणता व्यवसाय करतात कमल खुशलानी
Image of Laurene Powell Jobs Maha Kumbh 2025 preparations
Steve Jobs’ Wife : “यापूर्वी इतक्या गर्दीच्या ठिकाणी…” महाकुंभ मेळ्यात सहभागी झालेल्या स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीला ऍलर्जी
Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
Pramod kumar Success Story
Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा
Nahar brothers success story
Success Story: इंजिनिअर भाऊ झाले व्यावसायिक; करोना काळात सुरू केलेला व्यवसाय आता १०० कोटींच्या घरात पोहोचला

नयना आणि रंजन हे पन्नाशीतलं एक जोडपं. रंजन उद्योजक. खूप कष्टानं त्याने उद्योग उभा केलाय. मात्र, तो संतापी, ‘हम करेसो कायदा’ प्रवृत्तीचा आहे. त्याचे जलपा या स्त्रीशी विवाहबाह्य़ संबंध आहेत. नयनाला ते माहीत आहेत. ती दोघं बिझनेस टूरच्या नावाखाली आपल्याला फसवून उनाडत असतात असा नयनाला संशय आहे. तिच्यावरून नवरा-बायकोत दुरावा निर्माण झालाय. त्यांच्यातला संवाद संपलाय. जो काही व्यावहारिक संवाद होतो तोही एकतर्फीच. तापल्या तव्यागत. नयना रंजनला सतत टोमणे मारून, टोचून बोलत आपला संताप व्यक्त करत असते. गृहिणीची कर्तव्यं मात्र ती काटेकोरपणे पार पाडते. रंजनवर सूड उगवण्यासाठी तिने शॉपिंगचं व्यसन लावून घेतलंय. गरज नसतानाही प्रचंड महागडय़ा वस्तू ती ऑनलाइन मागवत असते. बऱ्याच वेळा ती त्या उघडूनसुद्धा बघत नाही. बायकोला क्रेडिट कार्ड दिलं की तिचं तोंड बंद होईल असं रंजनला वाटतं. त्यामुळे अपराधी भावनेतून त्याची काहीशी सुटका होते.

त्यांच्या मुलीचं- प्रियांकाचं लग्न झालंय.. शक्तीशी. रंजनने त्याला आपल्या ऑफिसात मदतीला घेतलंय. बेधडक प्रियांका रंजनला जवळची वाटते. ती आपला ‘मुलगा’ आहे असं तो मानतो. त्यांचा मुलगा परीक्षित कॉलेज करतोय. तो कलावंत वृत्तीचा आहे. वडलांच्या उद्योगात त्याला जराही रस नाही. त्याला नर्तक व्हायचंय. रंजनला मात्र त्याचे हे ‘बायकी’ उद्योग वाटतात. त्याने खेळांमध्ये, ‘पुरुषी’ गोष्टींत रस घ्यावा असा रंजनचा हट्ट असतो. नयना परीक्षितला लाडानं ‘परी’ म्हणून हाक मारते हेही रंजनला आवडत नाही. तिनं त्याला ‘बायल्या’ करून ठेवलंय असं त्याचं मत असतं. नयना मात्र मुलाच्या नृत्याच्या आवडीस प्रोत्साहन देते. रंजनशी उघड विरोध पत्करून! प्रियांकालाही आई जवळची असते. तिच्यापाशी ती आपलं मन उघड करू धजते. शक्तीचं दारू प्यायल्यानंतरचं हिंसक वर्तन, त्या भरात तिला मारहाण करणं, वगैरे गोष्टी ती नयनाकडेच सांगू शकते. नयना शक्तीला या गोष्टींचा जाब विचारायच ठरवते तेव्हा प्रियांका तिला जरा सबुरीनं घ्यायला सांगते. तिनं ही गोष्ट वडलांपासून दडवलेली असते. कारण तिला त्यांचा रागीट स्वभाव माहीत असतो. शक्तीही रागाचा पारा आणि दारू उतरल्यावर नॉर्मल होतो. तिची माफीही मागतो. त्यामुळे प्रियांकाला या गोष्टी वाढवायच्या नसतात.

रंजन सध्या धंद्यातील आर्थिक अडचणीमुळे बेचैन आहे. हैदराबादच्या रेड्डी नामक गुंतवणूकदाराने त्याच्या बुडत्या उद्योगात गुंतवणूक केली तरच तो या संकटातून बाहेर येऊ शकणार असतो. यासाठीच तो हैदराबादला गेलेला असतो. परंतु रेड्डी रंजनचा उद्योग प्रत्यक्ष पाहण्याचा आग्रह धरतो आणि त्याच्यासोबत मुंबईला येतो. दुसऱ्या दिवशी बारा वाजता तो रंजनच्या ऑफिसात येणार असतो.

दरम्यान, एक भयंकर घटना घडते. घरातल्या नादुरुस्त व्हॅक्युम क्लीनरला हात लावल्याने रंजनला प्रचंड शॉक लागतो. त्याला त्यापासून दूर करायला गेलेल्या नयनालाही मोठा शॉक बसतो आणि ते दोघं दूर फेकले जातात. ते जेव्हा शुद्धीवर येतात तेव्हा एक भीषण गोष्ट घडलेली असते. नयनाच्या देहात रंजनचा आत्मा शिरलेला असतो आणि रंजनच्या देहात नयनाचा! नयना रंजनसारखी वागू-बोलू लागते. तिच्या तोंडी रंजनची शिवराळ भाषा येते. तसंच रंजनही नयनासारखा बायकी बोलू लागतो. हे असं काय झालं? दोघांसाठीही हा शॉक असतो. नयनाला मात्र घडल्या गोष्टीचा सुरुवातीला आनंद होतो. रंजनवर सूड उगवायला ही नामी संधी आहे असं तिला वाटतं.

परंतु.. परंतु स्त्रीदेहातला पुरुष आणि पुरुषदेहातली स्त्री अशा या विचित्र गुंत्यामुळे जो काही अनर्थ (?) घडतो, त्याचंच नाव.. ‘व्हॅक्युम क्लीनर’!

लेखक-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी कौटुंबिक बेबनावाची उकल करण्यासाठी रचलेली ही फॅन्टसी! त्यातल्या बऱ्याच शक्यता लेखक-दिग्दर्शक या नात्यानं त्यांनी या नाटय़प्रयोगात समर्थपणे उतरविल्या आहेत. ज्यामुळे धम्माल रंजन होता होता प्रेक्षक अंतर्मुखही होतो. स्त्री आणि पुरुष यांच्यातील देहिक भेदाबरोबरच त्यांच्या मानसिक व भावनिक गरजा, वृत्ती आणि त्यांतून उभे राहणारे तिढे यांची छान गुंफण नाटकात आढळून येते. ‘परदु:ख शीतल’ असं म्हटलं जातं. ते रंजन आणि नयनाला एकमेकांच्या देहांत प्रवेश केल्यावर चांगलंच आकळतं. या दोघांना व्हॅक्युम क्लीनरचा शॉक बसेतो नाटक नेहमीच्या कौटुंबिक समस्येच्या ढंगानं जाणार असं वाटत असतानाच अकस्मात कलाटणी मिळते आणि नाटक सुसाट धावत सुटतं. या सिच्युएशनल फॅन्टसीतून जो विनोद निर्माण होतो तो भन्नाट आहे. अशोक सराफ आणि निर्मिती सावंत या दोघा कसलेल्या कलावंतांनी हे आव्हान अप्रतिमरीत्या पेललं आहे. दोघांनाही विनोदाची उत्तम जाण आहे. तिचा वापर करत दोघं नाटकभर अशरश: धम्माल बागडतात. त्यातून हास्याची कारंजी उसळत राहतात. नाटकाचं बीज बेतीव असलं, काहीसं अपेक्षितही असलं, तरी प्रेक्षक त्यात गुंगून जातो तो फॅन्टसीच्या वापरामुळे. दिग्दर्शक मांडलेकरांनी बारीकसारीक गोष्टींत, पात्रांच्या वर्तन-व्यवहारांत, हालचाली व लकबींतून विनोदाच्या अनेकानेक शक्यता धुंडाळल्या आहेत. त्यातून एक जोरकस, रंजक प्रयोग साकारतो.

नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी रंजनचं घर आणि मेकशिफ्ट ऑफिस छान उभारलं आहे. फॅन्टसीतली गंमत संगीतातून राहुल रानडे यांनी गहिरी केली आहे. रवि-रसिक यांच्या प्रकाशयोजनेतून ती आणखीनच गडद होते. परीक्षितची फुलवा खामकरकृत नृत्यं दिलखेचक आहेत. अश्विनी कोचरेकर (वेशभूषा) व उलेश खंदारे (रंगभूषा) यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे.

अशोक सराफ यांनी रंजनची उभय रूपं संस्मरणीय केली आहेत. नयनाचा आत्मा रंजनच्या देहात शिरल्यानंतरची त्यांची देहबोली, वागणं-बोलणं तसंच तत्पूर्वीची रंजनची बेदरकार, शिवराळ भाषा यांतला फरक त्यांनी सुंदर दाखवला आहे. विशेषत: रंजनचा परकायाप्रवेशानंतरचा ऑफिसला जाण्याचा प्रसंग. त्यावेळी त्याची झालेली गोची. त्यातून अभावितपणे घडणारे विनोद. हे सारं कुठलाही अभिनिवेश न आणता त्यांनी सहजगत्या अभिव्यक्त केलं आहे. निर्मिती सावंत या तर विनोदसम्राज्ञीच. त्यांची विनोदाची जाण आणि उपजत बिनधास्त वृत्ती यांचं ‘डेडली कॉम्बिनेशन’ त्यांनी या भूमिकेला दिलं आहे. नयनाची स्त्रीसुलभ संयमी, संशयी वृत्ती एकीकडे आणि रंजनच्या रूपात सारी बंधनं झुगारून मनमुक्त जगण्याचं परमिट मिळालेली नयना दुसरीकडे! लिंगबदलाचा हा मामला त्यांनी सर्वार्थानं ‘एन्जॉय’ केलाय. प्रथमेश चेउलकरचा परीक्षित लक्षवेधी आहे. त्याचं नृत्यातलं कौशल्य तर दाद देण्याजोगंच. तन्वी पालवनंही प्रियांका छान वठवली आहे. मौसमी तोंडवळकरांची जलपा दोनच प्रसंगांत भाव खाऊन जाते. सागर खेडेकरांचा शक्तीही चोख.

चार घटका मनसोक्त मनोरंजन हवं असेल तर ‘व्हॅक्युम क्लीनर’ला पर्याय नाही.

Story img Loader