१९७० – ८०च्या दशकात आपल्या आक्रमक खेळामुळे क्रिकेट विश्वात एकाधिकारशाही स्थापन करणारा वेस्ट इंडिज संघ आज हास्यास्पद अवस्थेत पोहोचला आहे. आर्थिक टंचाई व अंतर्गत मतभेदांमुळे जीर्ण अवस्थेत पोहोचलेल्या या संघाला आज अफगाणिस्तान सारखा नवखा संघही फारसा गांभिर्याने घेत नाही. अशीच काहीशी पडझड स्वत:ला सुपरहिरो विश्वातील दादा समजणाऱ्या ‘वॉर्नर ब्रदर्स’ उर्फ ‘डीसी’ची झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
डीसी व मार्व्हल या दोघांना आपण सुपरहिरो तयार करणारे कारखाने म्हणुन ओळखतो. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सुरु झालेल्या या कारखान्यांच्या भट्टीत आजवर बॅटमॅन, सुपरमॅन, कॅप्टन अमेरिका, आयर्नमॅन यांसारखे शेकडो सुपरहिरो तयार झाले आहेत. मागणी व पुरवठा या दोन घटकांभोवती जगातला प्रत्येक व्यवसाय फिरतो. या दोन घटकांमधील संतुलन नियंत्रीत ठेवण्याचे कसब ज्याला जमते त्याला आपला व्यवसाय दिर्घ काळ यशस्वीरित्या चालवता येतो. याची जाण डीसी व मार्व्हल या दोन्ही कारखान्यांच्या मालकांना होती, त्यामुळेच तब्बल आठ दशके ही मंडळी मनोरंजन क्षेत्रावर राज्य करु शकले. परंतु गेल्या १० वर्षांत सुपरहिरो विश्वात काही क्रांतीकारी बदल झाले, या बदलांमुळे मार्व्हलची भरभराट झाली, मात्र डीसीवर आपले दुकान बंद करण्याची वेळ आली आहे.
२००५ ते २०१२ दरम्यान ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित द डार्क नाइट ट्रायलॉजी या चित्रपट मालिकेने तुफान यश मिळवले होते. या पार्श्वभुमिवर डीसीने मार्व्हल प्रमाणेच एक सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला ही जबाबदारी जॅक स्नायडर व ख्रिस्तोफर नोलान या दोघांवर सोपवण्यात आली. दोघांनी मिळुन मॅन ऑफ स्टीलया सुपरहिरोपटातुन डीसी एक्सस्टेंडेड युनिव्हर्सची सुरवात केली. सुपरमॅनसाठी कमबॅक ठरलेल्या या सुपरहिरोपटाने तिकीटबारीवर जोरदार कमाई केली. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या डीसीने मॅन ऑफ स्टील-२ ची तयारी सुरु केली. परंतु त्याच दरम्यान मार्व्हल ने द अॅव्हेंजर्स-१ हा सिनेमा प्रदर्शित करुन आपल्या ६ चित्रपटांच्या मालिकेचा शेवट केला. या मालिकेने मिळवलेले यश इतके मोठे होते की त्यामुळे डीसी कंपनीत खळबळ माजली. मार्व्हल ने डीसीच्या आधीच २००८ मध्ये आयर्नमॅन या चित्रपटातुन आपले युनिव्हर्स बांधायला सुरवात केली आणि २०१२ मध्ये या बांधकामाचा पहिला भाग पुर्ण झाला. अचानक दिसलेले हे बांधकाम पाहुन डीसी कंपनीचे मात्र डोके फिरले मग त्यांनीही जस्टिस लीगच्या दिशेने पळापळ सुरु केली. आणि इथूनच दोन सुपरहिरो कारखान्यांमध्ये सर्वोत्कृष्ट सुपरहिरो चित्रपट तयार करण्याची स्पर्धा सुरु झाली.
मार्व्हल ने आयर्नमॅन -३ मार्फत सिनेमॅटिक युनिव्हर्सचा फेस -२ प्रकल्प सुरु केला तर दुसरीकडे डीसी ने मॅन ऑफ स्टील– २ ची जोरदार तयारी सुरु केली. ख्रिस्तोफर नोलान व जॅक स्नायडरया दोघांच्या कर्तुत्वावर विश्वास ठेउन डीसी ने कोट्यावधींची गुंतवणूक केली. परंतु मॅन ऑफ स्टील– २ च्या पटकथेवरुन दोघांमध्ये अंतर्गत मतभेद सुरु झाले. एकीकडे द डार्क नाइट ट्रायलॉजी, डंकिर्क, इन्सेप्शन सारखे सुपरहिट सिनेमे तयार करणारा ख्रिस्तोफर नोलान तर दुसरीकडे ३००, डॉन ऑफ डेड, वॉचमन यांसारखे अफलातुल चित्रपट तयार करणारा जॅक स्नायडर. या दोन ऑस्करधारी दिग्दर्शकांमध्ये डीसी कंपनी विभागली गेली. पुढे हे मतभेद इतके वाढत गेले की शेवटी नोलानच्या गटाने अगामी सर्व प्रकल्प जॅक स्नायडरच्या माथी मारत डीसी ला कायमचा रामराम ठोकला. ही घटना वरकरणी सामान्य वाटत असली तरी पुढे याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागणार होते.
नोलान गेल्यानंतर जॅकने मॅन ऑफ स्टील – २ ची पुर्नमांडणी करत त्याचे रुपांतर बॅटमॅन विरुद्ध सुपरमॅनमध्ये केले. परंतु त्याने केलेला बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन: डॉन ऑफ जस्टिस हा प्रयोग तिकीटबारीवर जोरदार आपटला. तर दुसरीकडे मार्व्हलची गाडी सुसाट पळत होती. त्यांनी अँटमॅन प्रदर्शीत करुन ६ चित्रपटांची आणखीन एक मालिका पुर्ण केली. आता डीसीमध्ये आणखिन खळबळ माजली कारण त्यांचे २ चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत मार्व्हलचे १२ सुपरहिरोपट बाजारात यशस्वी झाले होते. आता स्पर्धेत टिकुन राहण्याचा दबाव जॅक स्नायडरवर वाढत होता. यावर पर्याय म्हणुन त्याने आपला हुकूमाचा एक्का जस्टिस लीग बाहेर काढला. ज्याप्रमाणे मार्व्हलने अॅव्हेंजर्स तयार केला त्याचप्रमाणे डीसी ने सर्व सुपरहिरो एकत्र करुन जस्टिस लीगचा घाट घातला. परंतु हा चित्रपट तयार करणे इतके सोपे नव्हते कारण सर्व सुपरहिरो एकत्र करण्यासाठी लागणारी पार्श्वभूमी जॅकने तयार केलीच नव्हती. हा चित्रपट तयार होतो ना होतो तोच मार्व्हलने गार्डियन ऑफ द गॅलेक्सी २, स्पायडरमॅन : होमकमिंग आणि थॉर राग्नारोक हे सलग तीन बॉम्ब डीसी वर टाकले या तीन चित्रपटांचा दबाब इतका जबरदस्त होता की त्यांनी जस्टिस लीगची पूर्ण हवाच काढून टाकली. आता गुंतवणूकदारांनीही जॅक स्नायडरवर पैसे लावण्यास साफ नकार दिला. परिणामी जस्टिस लीगचा प्रयोग आणखी पुढे ढकलण्यात आला.
त्याच दरम्यान डीसीने शेवटचा प्रतिकार म्हणुन वंडर वुमनला स्पर्धेत उतरवले. निर्मात्यांना या चित्रपटाकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. परंतु पॅटी जेंकिन्स व गल गडॉट या स्त्री शक्तींनी अक्षरशः दुर्गामाता व कालीमातेचे रुप धारण करत मार्व्हलच्या तब्बल १७ सुपरहिरोपटांचे आव्हान एकाच चित्रपटातुन परतवुन लावले. १ हजार कोटींचा गल्ला जमवणाऱ्या वंडर वुमनने थेट मार्व्हलचा एक्का समजल्या जाणाऱ्या आयर्नमॅनला आव्हान दिले. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष डीसीकडे वळले. परंतु त्याच दरम्यान काही कौटुंबिक कारणांमुळे जॅक स्नायडरने डीसीला कायमचा रामराम ठोकला. परिणामी दिग्दर्शकाशिवाय तयार झालेला जस्टिस लीग अपेक्षेप्रमाणे तिकीटबारीवर जोरदार आपटला. या चित्रपटामुळे डीसीची इतकी नाचक्की झाली की शेवटी त्यांना स्पर्धेतुन माघार घ्यावी लागली. पुढे मार्व्हलने ब्लॅक पँथर व अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर हे दोन सुपरहिरोपट प्रदर्शित करुन डीसीला अक्षरश: स्पर्धेतुन बाहेर फेकून दिले. अंतर्गत मतभेद, चुकिचे निर्णय, अयोग्य गुंतवणूक, दर्जाहीन पटकथा आणि चाहत्यांना गृहीत धरल्यामुळे शेवटी ८ दशकांची पुण्याई असुन देखिल डीसीला आपले एक्सस्टेंडेड युनिव्हर्सचे दुकान बंद करावे लागले.