श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज यांच्यावर गेल्या वर्षांत येऊन गेलेल्या भक्तीपर चित्रपटांनंतर आता ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ हा शनिदेवांवरील चित्रपट शुक्रवार, ८ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. शनिदेवांचे वेगळे सकारात्मक रूप या चित्रपटाद्वारे दाखविण्याचा प्रयत्न निर्माते-दिग्दर्शक राज राठौड करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भक्तीपर संगीत अल्बम काढल्यानंतर राज राठौड चित्रपटाकडे वळले असून यात शनिदेवाच्या भूमिकेतील मििलद गुणाजीशिवाय सुधीर दळवी, मनोज जोशी, वर्षां उसगांवकर, आशुतोष कुलकर्णी,  वैभवी, कांचन पगारे, राहुल महाजन, पंकज विष्णू आदींच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on lord of shingnapur movie