पंकज भोसले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
केवळ भारताच्याच संदर्भात बोलायचे झाले, तर हॉलीवूडप्रेम पंचवीसेक वर्षांपूर्वी अधिक विस्तारले ते केवळ तिथले रोमॅण्टिक सिनेमे नुकत्याच आलेल्या वाहिन्यांमुळे खोऱ्याने उपलब्ध झाल्यामुळे. तत्पूर्वी इथे हॉलीवूडचे गाजणारे सिनेमे म्हणजे देमार अॅक्शन किंवा स्पेशल इफेक्ट्सचे चित्रपट. या वाहिन्यांवरच्या सिनेमांमुळे इथली एक पिढी रोमॅण्टिक सिनेमांच्या पारायणात वाढली. ‘व्हेन हॅरी मेट सॅली’, ‘यू हॅव गॉट मेल’, ‘स्लीपलेस इन सिएटल’, ‘अॅडिक्टेड टू लव्ह’ या मेग रेयन अभिनित सिनेमांचा धडका या वाहिन्यांच्या आरंभकाळात जोमात सुरू असे. ज्युलिया रॉबर्ट्सचे ‘प्रेटी वुमन’नंतर आलेले डझनांहून अधिक रॉमकॉम आणि जेनिफर लोपेझ, रिस विदस्पून, ड्रय़ू बॅरिमोअर, पॅनलॉप क्रूझ, कॅथरिन झेटा-जोन्स, अँजलिना जोली या अर्धा डझन मदनिकांनी बहरलेल्या दशकातील हॉलीवूडच नाही तर बॉलीवूडच्याही प्रेमपटांचा ल.सा.वि. सहज काढता येण्यासारखा आहे.
प्रेमाविषयी अनास्था असलेल्या किंवा ते करण्यात स्वारस्य नसलेल्या व्यक्तिरेखांभोवती योगायोगांची आणि अशक्य घटनांची मालिका घडू लागते. ‘जाने क्यू लोग प्यार करते है’ छापाचे गाणे न म्हणता, प्रेम तिटकाऱ्याने वावरणाऱ्या या व्यक्ती मग हळूहळू या पाशात अडकू लागतात. विनोदाची अचूक मात्रा, साहाय्यक अभिनेत्यांचे (यात दूरच्या-जवळच्या आप्तापासून ते रस्त्यावरचा कुणीही ऐरागैरा ‘मुहोब्बत बडे काम की चीज है’ या गीतातील आशयासारखा अविरत बडबड करणारा डोक्यावर पडलेली व्यक्ती असतेच.) या जगात करिअर, पैसा, मान-मरातब या छटाकभर गोष्टी असल्याचे पटवून देणारे टाळीफेक-तत्त्वज्ञानी संवाद, नायक-नायिकांच्या आनंदस्मृतींच्या चौकटी आणि डोळ्यांत पाणी आणणाऱ्या प्रेमसाक्षात्काराच्या हळव्या क्षणांनी यशस्वी रोमॅण्टिक कॉमेडी घडते. देशी मासले आठवत नसतील तर ‘दिल तो पागल है’, ‘दिलवाले दुल्हनिया लेजाऐंगे’, ‘दिल चाहता हैं’ यांसह कित्येक सिनेमांमध्ये प्रेमअढी ते परिवर्तनापर्यंतचे कथानक एकामागोमाग एक निश्चित घटकांनी परिपूर्ण होताना दिसते.
हॉलीवूड-बॉलीवूडच्या प्रेमकथा सरधोपटी असल्या तरी गंमत म्हणजे, त्यांचा दर्शक घटलेला नाही. चित्रकर्त्यांनाही या फॉम्र्युल्यात नव्या वाटाव्या अशा करामती करता येतात आणि फेब्रुवारी महिन्याच्या आसपास असंख्य प्रेमपटांची जत्रा भरते. यंदाच्या जत्रेतील ‘इझण्ट इट रोमॅण्टिक’ हा आवर्जून अनुभवावा असा चित्रपट आहे. सरधोपटपणा टाळण्याचा आभास निर्माण करण्यासाठी फॉम्र्युल्यात फार मोडतोड करण्याचा इथे प्रयत्न केला नाहीए, तर गेल्या पंचवीस वर्षांतील रोमॅण्टिक सिनेमांतील सरधोपट घटकांचा तिरकस शैलीत समाचार घेतला आहे. म्हणजे यातील प्रमुख व्यक्तिरेखा नॅटली (रेबेल विल्सन) पंचवीस वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये हॉलीवूडच्या रॉमकॉमनी पोळली गेलेली दाखविली आहे. दिवसभर टीव्हीच्या पडद्यावर गोड-गोड शेवट दाखविणाऱ्या या चित्रपटांनी तिची जगण्याची विचारसरणी बनायला नको म्हणून तिच्या आईने तिला आपल्या रांगडय़ा भाषेत वास्तव जगाची दीक्षा दिलेली असते. पंचवीस वर्षांनतर रोमॅण्टिक कॉमेडी सिनेमा आणि पर्यायी रोमान्सबाबत कडव्या मतांत परिवर्तन झालेली नॅटली आता न्यू यॉर्कमध्ये वास्तुविशारद म्हणून एका बडय़ा संस्थेत कामाला असते. तिच्या ओंगळवाण्या परिसरापासून ते कार्यालयातील कोलाहलपूर्ण वातावरणात प्रेमसंधी मर्यादित असतात. त्यात ‘तू ज्युलिया रॉबर्ट्स नाहीस.’ हे लहानपणी आईने बिंबवायची गरज नसलेल्याोवाढव्य शरीराच्या नॅटलीला स्वत:वरही फार प्रेम नसते. उपमांच्या आघाडीवर आपण रोमॅण्टिक कॉमेडीमधील नायिकांसारखी चवळीच्या शेंगेसारखी नसल्याची जशी खंत तिला नाही, तशीच फणसाहून अधिक गरगरीत असल्याची चिंताही वाटत नाही.
ऑफिसमधील मोजक्या मित्र-मैत्रिणीसोबत संथपणे आयुष्य सुरू असताना एका अपघातामध्ये तिच्या डोक्यावर मार बसतो आणि तिच्या भवतालचा परिसर पारंपरिक रोमॅण्टिक कॉमेडी सिनेमांसारखा बनून जातो. घराभोवतालच्या परिसरापासून ते ऑफिसच्या परिसराला अविरत प्रेमझळाळी प्राप्त होते. सगळेच लोक छान-छान, आग्य््रााच्या पेठय़ाचा गोडवा जोडून बोलू लागतात. तिच्या ऑफिसमध्ये क्लायण्ट म्हणून येणारी एक बडी असामी तिच्या प्रेमात पडते. संपूर्ण शहरावर अद्भुत प्रेमसंमोहन पसरते. इतकेच नव्हे तर शहरात उडणारे पक्षीही बदामाच्या आकाराचे कडे करून उडताना दिसतात. लहानपणीच काडीमोड घेतलेल्या या सिनेप्रकाराला आपल्या वास्तव आयुष्यात प्रत्यक्षात घडताना पाहून प्रचंड वैतागलेली नॅटली या सगळ्याची यथेच्छ खिल्ली उडवताना दिसते. व्हेनसा कार्लटनच्या ‘थाउजंड माइल्स’ ते सिक्सपेन्स नन द रिचरच्या ‘किस मी’ या गाण्यांपर्यंत प्रेमगीतांना अद्वितीय विनोदी प्रसंगांसाठी राबवून इथला विनोद घडविला आहे. अर्थात रोमॅण्टिक कॉमेडीतील सरधोपटपणा टाळण्याचा आभास तयार करत इथे कथानक पारंपरिक घटकांना कवटाळतेच. पण तोवर रंगतदार विनोदाची आतशबाजी सुरू राहते.
रेबेल विल्सन ही ऑस्ट्रेलियन अभिनेत्री गेल्या दशकभरात आपल्या वैशिष्टय़पूर्ण विनोदी भूमिकांनी गाजत आहे. तिचा एकपात्री खेळ म्हणून समोर येत असलेल्या या चित्रपटात इतर व्यक्तिरेखा शोभेसारख्या राबविल्या आहेत. त्यात प्रियांका चोप्रा हे नाव भारतीयांना आकर्षणासाठी वाटले, तरी यात फार ठसा उमटवू शकत नाही. प्रेम आणि रॉमॅण्टिक सिनेमांवरच्या इथल्या बोचऱ्या टीका कायम लक्षात राहू शकणाऱ्या आहेत. गेल्या महिन्याभरातील ऑस्कर सिनेमांचा ज्वर उतरविण्यासाठी हा चांगला हलकाफुलका पर्याय आहे.