‘शाळा’, ‘आजोबा’, ‘फुंतरू’ यांसारखे यशस्वी चित्रपट देणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता सुजय डहाके कुस्तीवरील ‘केसरी – २ंऋऋ१ल्ल’ हा चित्रपट घेऊन आला आहे. प्रत्येकोत काही नवीन देणाऱ्या सुजयचा हा चित्रपट कसा असेल यासाठी प्रेक्षकांना २८ फेब्रवारीर्पयच वाट पाहावी लागणार आहे.
‘केसरी – २ saffron’ या चित्रपटात एका सामान्य घरातील कुस्तीगिराच्या जिद्दीचा प्रवास मांडण्यात येणार असून यानिमित्ताने विराट मडके मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण क रणार आहे. कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांच्या काळात कुस्तीगिरांसाठी कसरत आणि खुराकासाठी लागणारा खर्च सरकार करत होते. परंतु या खेळांना आता नावापुरता राजाश्रय उरला आहे. कुस्ती रांगडा खेळ असला तरी त्याचा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य घरातील मुलगा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचे स्वप्न बघतो आणि ते पूर्णत्वास कसे नेतो याचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात विराट मडके, महेश मांजरेकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, प्रवीण तरडे, नंदेश उमप या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाचे संकलन दिग्दर्शन सुजय डहाकेचे असून लेखन नियाज मुजावर यांनी केले आहे. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे संगीत दिलेल्या या चित्रपटाला क्षितिज पटवर्धन, वैभव जोशी, संजय टेम्भूर्णी यांच्या गीते केली आहेत. ‘सामन्यासारखा सराव दररोज केला तर सराव केल्यासारखा सामना निघून जाईल’ असा विश्वास देणारा वस्ताद आणि एका सामान्य कुटुंबातील पहिलवान ‘महाराष्ट्र केसरी’ होण्यासाठी काय मेहनत घेतात, संघर्ष करतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना २८ फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे.