लेना डनहॅम हिची टीव्ही मालिका ‘गर्ल्स’च्या अभूतपूर्व लोकप्रियतेनंतर जगभरामध्ये स्त्री वादाची संकरित व्याख्या तयार झाली. अमेरिकेतील टीव्ही, सिनेमा किंबहुना साहित्यामधूनही स्त्री-माजवाद उफाळल्याचे स्पष्ट होऊ लागले. पुरुषी अन्यायाच्या, त्यांच्या स्त्रियांवरील शतकोन्शतकांच्या दडपशाहीचा इतिहास पाहिला तर एका टप्प्यानंतर स्त्री-माजवादाचे समर्थनही करता येण्यासारखे आहे. मुद्दा नव्या स्त्रीवादाच्या असण्या किंवा नसण्याबाबतच्या प्रोत्साहन-विरोधाचा नाही. पण यामुळे एकामागोमाग स्त्री-स्वातंत्र्याचा ढोल वाजविणाऱ्या एकसुरी सिनेमांची हॉलीवूडमध्ये अनावश्यक गर्दी होऊ लागली आहे. अन् त्याचाच परिपाक म्हणून आणखी उग्र पुरुषवादी सिनेमांचीही (ज्यात स्त्रीवादावर टीका-खिल्ली ही महत्त्वाची बाब असते) अधिकाधिक उभारणी झालेली दिसते. कुटुंबात रोजच्या व्यवहारामध्ये कुचंबणोत्कट अवस्थेत गेलेल्या अत्यंत दडपलेल्या स्त्रिया यंदा अनेक सिनेमांमधून पाहायला मिळतात. स्कारलेट जोहान्सन अभिनित ‘रफ नाईट’, टोनी कोलेट प्रमुख भूमिकेत असलेला ‘फन मॉम डिनर’, मॅकेन्झी मोझी अभिनित ‘गर्ल्स नाईट आऊट’, ‘क्वीन लतीफा’चा ‘गर्ल्स ट्रीप’, एमी शूमरचा ‘स्नॅच्ड’ याशिवाय कैक चित्रपट यंदा नवस्त्रीवादाचे एकसुरी समर्थन करण्यासाठी आले. जगभरातील सारे पुरुषच वाईट कसे हे सांगणारे आणि दाखविणारे थोडय़ा-फार प्रमाणात बदललेल्या कथानकाचे हे सारे सिनेमे तिकीटबारीवर कोसळत असले, तरी सध्या तरी थांबत नाहीएत. वर स्त्रियांच्या दृष्टीनेच अधिकाधिक पुरुषवाद प्रगट करणारे ‘बे-वॉच’ आणि जेम्स बॉण्डीछापाचे सिनेमे येत आहेत. ज्याचेही एकसुरी कथानक महिलांविषयी उद्धट, अपशब्दांचे आणि वाईट मतांचे प्रगटीकरण करणारे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा