बावळट विनोद नावाचा एक प्रकार सध्या सगळ्याच चित्रपटसृष्टीत रूढ होतोय. दिग्दर्शकाला सांगायचे काय, अभिनेत्यांना दाखवायचे काय आणि लोकांनी पाहायचे काय याची रूपरेषा न ठरवता वाटेल त्या तुंबडय़ा लावत चिनी खाद्यपदार्थ बनविण्याच्या वेगाशी प्रभावित होऊन चित्रपट बनविले जात आहेत. भारतीय चित्रपटांचा नव्वदोत्तरीचा पंधरा वर्षांतील टप्पा अशा चित्रपटांनी समृद्ध होता. त्यातील गंभीर सिनेमेही आज भरपूर विनोदी म्हणून पाहिले जाऊ शकतात. गेल्या काही वर्षांत नायक-नायिका आणि खलनायकांपासून चित्रपटात भूमिकांची उतरंड असलेले सगळेच बावळटपणाचे कहर करणारे विनोदी सिनेमे वाढू लागलेत. ते जराही थोर नसले तरी त्यातल्या व्यक्तिरेखांच्या मूर्खपणासाठी हसवतात. आपल्याकडील गोलमाल, वेलकम, ग्रॅण्डमस्तीसारख्या चित्रपटांना या कक्षेतील म्हणता येईल. त्यांच्या परदेशी आवृत्त्या इतरत्रही पाहायला मिळतात. अॅण्टोनिओ बॅण्डरस या अॅक्शन अभिनेत्याने वठविलेला ‘गन शाय’ हा ताजा ब्रिटिश सिनेमा बावळट विनोदाच्या पठडीला आणखी खोलीवर नेऊन ठेवणारा चित्रपट आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा