भारतीय चित्रपटलावर कधी नव्हे इतका गमतीशीर सोहळा सुरू झाला आहे. एका बाजूला देशातील पूर्णच्या पूर्ण पिढी देशी सिनेमांशी नाळ तोडून बसली आहे. ही पिढी परदेशी आयपी अ‍ॅड्रेस वापरायचे शिकून वगैरे चित्रजगताची चाचेगिरी (पायरसी) करण्यात रमली आहे. देशात ‘पद्मावत’ नामे सिनेमावर सुरू असलेला वाद त्यांच्या खिजगणतीतही नाही. आयएमडीबी, मेटाक्रिटीक आणि रॉटन टोमॅटो डॉटकॉमवरच्या सिने-सीरिजच्या टॉप रेटिंग्जवरून ते धुंडाळण्यात ताजी पिढी गुंतली आहे. ‘एव्हीएन अ‍ॅवॉर्ड’मधील पारितोषिक विजेत्यांची यादी काढून ही पिढी समाज आणि सरकार अमान्य नेत्रसुखाच्या घटिका वाढवत चालली आहे. अन् त्या धर्तीवर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी नवी ‘आग’ लावून तथाकथित संस्कृतीरक्षक, महिलावादी संघटना, चित्रवर्तुळ आणि ‘मायाजाल चाच्यां’ना अवाक्  करून टाकले आहे. उदात्ततेचा आव आणत करण्यात आलेल्या  ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रथ’ या ढोंगाविष्कारासोबत भारतीय नेत्रलोलुप मानसिकतेवरही एक दृष्टिक्षेप..

राम गोपाल वर्मा यांचा ‘जीएसटी’ (गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रथ) हा प्रजाकसत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवसापासून भारतासह जगभरात प्रचंड मोठी ढवळणूक करीत आहे. म्हणजे आजवर वर्माचा खूप भला आण अति बुरा सिनेमा अनुभवलेल्यांनाही त्याच्या कामामध्ये किंचित कुतूहल आहे. पण त्याच्या ‘गन्स अ‍ॅण्ड थाईज’ नामक वेबसीरिजच्या (जिचे संशोधन यू टय़ूबवर सर्वाधिक होत असते) नुसत्या ट्रेलरची हीट्स संख्या कोटय़वधीच्या घरात आहे. मुंबई माफिया जगतावरच्या या सीरिजच्या अल्पदर्शनातच अनावृत्त स्त्रीदर्शन, अश्लाघ्य शिवीस्पर्धा आणि क्रौर्यदर्शनाचा कळस गाठला गेला आहे. तथाकथित सिनेअभ्यासक आणि सिनेसमीक्षक वाचाळांना ‘वास्तव आणि सिनेमा’वर चपखल उदाहरण देता येणारे चित्रपट सध्या हिंदीमध्ये येत आहेत. पण गंमत म्हणजे आजच्या नवसाहित्याला (आणि एकूणच साहित्याला) जसे सार्वत्रिक अनुत्साहातून नाकारले जात आहे, तशीच गत वास्तववादी सिनेमांची बनली आहे. म्हणजे आपला प्रेक्षकवर्ग अजून चित्रपटात सुसंस्कृत असल्याचा आव आणत पन्नास वर्षांपूर्वीच्या ‘चुंबन दृश्याऐवजी दिसणारी छत्रीतील डोकी’ किंवा सतारीच्या संगीतात ‘झाडाच्या आड तोंड लपविणारी जोडपी’ पाहण्याच्या मानसिकतेमध्येच अडकला आहे. हा प्रेक्षक सनी लिओनीची आयटम नंबर्स आणि चित्रपटातील  सुमार कामावर तोंड वेंगाडतो. प्रत्यक्षात डाऊनलोड करून नयनपर्यटन करतो.

subhash ghai reveals success secret
कलाकृतीत भारतीयत्व असेल तर ती दीर्घकाळ यशस्वी ठरते, दिग्दर्शक सुभाष घई यांनी उलगडले त्यांच्या यशामागचे इंगित
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Tharala Tar Mag Maha Episode Promo Out Arjun Propose to sayali
Video: अर्जुनचं ‘ते’ कृत्य पाहून प्रियाला बसला धक्का आता…; पाहा ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महाएपिसोडचा प्रोमो
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
Loksatta viva Bollywood faces of International brands Brands actress
विदेशी ब्रॅण्ड्सचे बॉलिवूड चेहरे
Ashok MaMa Colors Marathi New Serial
मुहूर्त ठरला! ‘अशोक मा.मा.’ मालिकेत झळकणार प्रसिद्ध अभिनेत्याची लेक अन् ‘कलर्स मराठी’ची लोकप्रिय नायिका, पाहा प्रोमो
indian-constituation
संविधानभान: आदिवासी (तुमच्यासाठी) नाचणार नाहीत!

तर गेल्या आठवडय़ामध्ये ‘डाऊनलोड’ जगतातील भारतीय चाच्यांना वनथ्रीथ्रीसेव्हन (भारतात बंदी असूनही तेथे पोहोचण्याचे सहज शेकडो मार्ग उपलब्ध आहेत.) या संकेतस्थळावर राम गोपाल वर्मा याचा ‘सेक्स गॉड अ‍ॅण्ड ट्रथ’ हा एकोणीस मिनिटांचा सिनेअवतार सापडला आणि काही तासांतच त्याची डाऊनलोड आकडेवारी एकक-दशक-शतक  या आपल्या मध्यमवर्गीय मराठी गणतीच्या पलीकडे जाऊन पोहोचली. ‘मिया माल्कोव्हा हिचा तत्त्वज्ञानाचा खजिना’ (फिलॉसॉफिकल ट्रेझर ऑफ मिया माल्कोवा) शोधण्यासाठी भारताच्या विविधतेतील एकतेचे दर्शन झाले. म्हणजे वय, लिंग, धर्म,जाती-पातींचे भेद बाजूला टाकून सारे तत्त्वज्ञानाचा खजाना हस्तगत करण्यासाठी ‘खुल जा सिमसिम’चा मंत्र पुटपुटत एकवटले. काहींनी उघड किंवा छुप्यारीत्या या क्लिप्सचा व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांतून या खजिन्याचा प्रसार केला असेल. काहींनी छानपैकी पाहूनही ‘आपण असलं काय पाहात नाही बुवा’ म्हणत या सिनेमाला हिडन फोल्डरमध्ये स्थान दिले असेल. तर काही ज्ञान भुभूक्षितांनी मिआ माल्कोवाच्या अतिरिक्त अभ्यासाचा चंग करून तिच्या कलेची कदरदानी सुरू केली असेल.

‘सेक्स गॉड अ‍ॅण्ड ट्रथ’ या चित्रपटात वेशभूषाकाराची कोणतीही भूमिका नाही. कारण संपूर्ण चित्रपटात मिया माल्कोवा हिला जन्मदिवश मिळालेल्या नैसर्गिक वस्त्रांमध्येच चित्रांकित करण्यात आले आहे. आता देवाने दिलेल्या सौंदर्यलेण्यांच्या प्रदर्शनासोबत तत्त्ववेत्ते आणि मानववंशशास्त्रज्ञांच्या थोर उधृतांच्या पंगतीमध्ये शेवटचे नाव हे राम गोपाल वर्मा याचे पाहून विनोदाचा इतका गंभीर प्रकार राम गोपाल वर्माने आजवर कधीच हाताळला नसल्याची खात्री पटेल.

आडनावाने रशियन वाटत असली, तरी फ्रेंच-जर्मन-आयरिश असे मिश्र रक्त असलेल्या मिया  माल्कोवा ही अमेरिकी पोर्नस्टार पोर्नपटलावरचे ऑस्कर  म्हणजेच एव्हीएन पटकावलेल्या शेकडो शरीरांच्या गर्दीतला एक गोरसवर्णी चेहरा. भरजरी अंगापिंडामुळे  आणि आपल्या घरातच (भाऊ आणि माजी पती) पोर्न व्यवसायातील बडी प्रस्थ असताना या क्षेत्रात स्थिरावली. राम गोपाल वर्माच्या आवडीत आणि कदाचित सौंदर्य निकषांवर पूर्णपणे खऱ्या ठरलेल्या या पोर्नपरीने सर्वाग ओतून मेहनत केली आहे. परिणामी आता तिच्या व्हिडीओ, क्लीप्सना यापुढे भारतातून बिनथांबी हीट्स मिळणार आहेत. तिचे दर्शनमूल्य  त्यातून वाढणार आहे. तिचे शारीर तत्त्वज्ञान चित्रपट रसास्वाद  वर्गात  सिनेआकलनाची  ‘फ्रेम टूू फ्रेम’ किंवा ‘लाँग शॉट’- ‘क्लोज  शॉट’ भाषेत चिकित्सा करणाऱ्यांनीच खरे तर पडताळून सांगावे. म्हणजे राम गोपाल वर्माला ‘जीएसटी’ या नावातून सरकारच्या करधोरणावर टीका करायची आहे, की सेन्सॉरच्या बालीश व्यवस्थेला थोबाडीत लगावायची आहे, याचे आकलन होईल. गेल्या आठवडय़ामध्ये वर्माने या सिनेमातील १९ मिनिटांतील संगीताचेही महत्त्व विशद केले. हा चित्रपट पाहण्यासाठी उत्तम प्रतीचा हेडफोन हवा, कारण तसे यातील एम.एम. क्रीम यांचे  पाश्र्वसंगीत  आहे, असा त्याचा दावा होता. हिंदीत  इस  रात की सुबह नहीमधील ‘चुप तुम रहो’ किंव क्रिमीनल चित्रपटातील ‘तु  मिले,  दिल खिले’ हे गाणे देणाऱ्या एम.एम. क्रीम यांनी कुण्या एकेकाळी नरसिंह  राव यांच्या सरकारची भलामण करणारी  ‘मुझको है  आशा’, ‘कहां मिलेगा  ये वतन हमारा’ सारखी  सुंदर  गाणी  दिली होती. (सरकार भलामणीकरता ती वापरली गेली  नसती, तरी लोकप्रिय  झाली असती अन् ती त्यासाठी वापरली गेली म्हणून आज बऱ्यापैकी अनुपलब्ध आहेत

मिया माल्कोवा हिचा दिगंबर पंथीय बाणा अधिक फुलविण्याचे काम या संगीताने केले असो किंवा नसो, गेल्या आठवडय़ामध्ये रेल्वेत पन्नास रुपयांत मिळणारा हेडफोन टाकून जेबीएल, सोनीच्या महागडय़ा हेडफोनची खरेदी मोठी झाली बहुधा. या साऱ्या प्रकारानंतर गंमत होती ती एका राजकीय पक्षाच्या महिला  गटाने राम गोपाल वर्माच्या पुतळ्याची जाळपोळ  करून वर त्याच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याची.

‘भारतीय तरुणाईला राम गोपाल वर्मा याला कोणता संदेश द्यायचा आहे?’ असा सवाल  करणाऱ्या राजकीय अज्ञानखोरांना निव्वळ  रामगोपाल वर्माचीच ज्ञानपोई पोर्न वाटत फिरते असा समज असण्याचीच अधिक  शक्यता आहे. तरी बरे सारे वैज्ञानिक शोध आणि प्रगती पुराणकाळात भारतीयांनीच केली, अशी दर्पोक्ती करणाऱ्या वाचाळखोरांनी ‘पोर्न  हा भारतानेच तयार केलेला घटक असल्याचा दावा अद्याप केला नाही. नाही तर वात्सायनाचा कामसूत्रचा ‘माशी टू माशी’ अनुवाद सर रिचर्ड बर्टन याने केल्यानंतर पाश्चिमात्य जगताला पोर्न माहिती झाले. मग तिकडे ते एचडी क्वालिटीमध्ये विकसित झाल्यावर मागास  बनलेल्या आजच्या आधुनिक भारतात पोहोचले, असे तारे उधळले गेले असते.तर सिनेमॅटिक स्वातंत्र्याच्या नावाखाली लैंगिक उद्दिपनाची आवर्तने घडवून दाखणिाऱ्या राम गोपाल वर्माच्या ढोंगाविष्काराने ना स्त्री प्रतिमा डागाळली ना वधारली, ना तिच्यामुळे कोणत्याही पिढीवर मानसिक आघात झाला ना संदेश मिळत नसल्यामुळे कोणत्याही पिढीने नाके मुरडत तो नाकारला. राम गोपाल वर्माने ही आपली सुरुवात असून अशा प्रकारचा सत्यान्वेषी उपक्रम तो यापुढेही मांडणार असल्याचे जाहीर केले. वर किती लाख डाऊनलोड्स झाली, किती लोकांनी सिनेमा पाहिला, बायकांनी या सिनेमाची पोर्न नाही  म्हणून कशी तारीफ केली, याची जाहिरातबाजीच ट्विटरवर उघडली आहे. त्यामुळे आता कोणत्या पोर्नस्टारची तत्त्वज्ञानी आवृत्ती चक्षूमोदनासाठी दाखल होते, याकडे अवघे भारतजन  ‘खुल जा सिमसिम’चा मंत्रोच्चार करीत डोळे लावून बसले आहेत.

दर्शकांचे दर्शन

अधिकृत आकडेवारीनुसार देशात दररोज ३० ते ७० टक्क्यांहून अधिक इंटरनेटची रहदारी निव्वळ पोर्न वेबसाइट्सवर असताना माहितीच्या विस्फोटाची झळ भारताला तरी लागणार नाही हे स्पष्ट आहे. इतक्या मोठय़ा संख्येतील मोबाइल, लॅपटॉप, डेकस्टॉपवरील खुले  किंवा छुपे नेटधारक निव्वळ लैंगिक दृश्य माहिती मिळविण्यासाठी किंवा त्यांचा अभ्यास करण्यासाठी धडपडत असतात.

सिनेमाशी मनसांगड

कोणताही पोर्न सिनेमा जितकी नेत्रसुखाची आवर्तने घडवू शकतो, त्याहून थोडी कमी मिया माल्कोवाच्या शरीर भंडाराकडे पाहताना जाणवते. अर्थातच हा सापेक्ष मुद्दा असला, तरीही या सिनेमातील मिया माल्कोवाची स्वगते, म्हणजे कोणत्याही लैंगिक गरजांनी बहरलेल्या  व्यक्तीच्या  मनातल्याच कल्पनांचा विस्तार आहे. त्याला राम गोपाल वर्माच्या जाणीवांनी  तयार झालेला दृश्यविकास म्हणायचे की दृश्यविकार  हे ज्याने त्याने ठरवायचे आहे. भारतीय  लोकांच्या दांभिकतेच्या वर्मावर बोट या निमित्ताने ठेवले गेले, तेही नसे थोडके. बाकी तुमच्या/माझ्या मनात  काय आहे, याची लिटमस चाचणी हा सिनेमा पाहिल्यानंतर लगेचच मिळते. अन् तरी राम गोपाल वर्मावर या सिनेमाची संकल्पना चोरल्याबद्दल कुणीतरी गुन्हा दाखल केलाय म्हणे.