.. तुमच्या लिबर्टीचा स्टॅच्यू होऊ देऊ नका, असा संवाद कानावर येतो आणि सुजाण प्रेक्षक भानावर येतात. वास्तव त्यांच्या डोळ्यापुढे तरळू लागतं आणि आपला समाज नेमका कोणत्या मार्गाने कुठे निघालाय हे समजायला लागतं. ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ या नाटकात असे बरेच संवाद आहेत की जे तुम्हाला एक माणूस म्हणून विचार करायला भाग पाडतात. जाती-पातींमधली अनागोंदी बदलण्यासाठी प्रवृत्त करतात. देवत्व म्हणजे नेमकं काय, यावर भाष्य करतात. पण सध्या या ‘लिबर्टी’चीच गळचेपी होत असल्याचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत.
या नाटकाचे तीन प्रयोग जेव्हा शिवाजी मंदिर नाटय़गृहात झाले तेव्हा तिन्ही वेळा ‘साऊंड सिस्टीम’ बंद करण्यात आली होती. पनवेलच्या नाटय़गृहात तर गंभीर प्रकार घडला. नाटक सुरू असताना एक अज्ञात इसम विंगेत आला आणि एका कलाकाराला यापुढे या नाटकाचा प्रयोग केला तर या नाटय़गृहात बॉम्बस्फोट घडवू अशी धमकी देऊन गेला. तो इसम कोण?, याचा पत्ता अजूनही लागलेला नाही. नाटय़गृहाच्या व्यवस्थापकांना हा घडलेला प्रकार माहितीच नाही. चौकशी करून सांगतो, असं त्यांचं लालफितीतलं ठोकळेबाज उत्तर आलं. याविरुद्ध पालिकेत, पोलीस स्थानकामध्ये नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांनी तक्रार केली खरी, पण निकाल अजूनही लागलेला नाही.
दामोदर हॉलमध्ये तर चीड आणणारा प्रकार गांधी जयंतीच्या दिवशीच झाला. सुट्टी असल्यामुळे प्रयोग हाऊसफुल्ल होता. पहिला अंक झाला. मध्यंतरानंतर प्रेक्षक स्थानापन्न झाले, पण त्यानंतर नाटय़गृहातला वीजपुरवठा खंडित झाला. एकच गोंधळ माजला. कुणाला काही कळेना. साराच गहजब. प्रेक्षकांना काही कळत नसल्यामुळे त्यांनी नाटय़गृहातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधायचे ठरवले, पण कर्मचाऱ्यांकडे प्रेक्षकांच्या प्रश्नांचे उत्तर नव्हते. नाटय़गृहाचे व्यवस्थापक तर अज्ञातवासात गेले होते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी संवाद साधला नाही. ‘बेस्टच्या कार्यालयात मी वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करायला गेलो’, असे त्यांनी नाटक संपल्यावर सांगितले. पण नाटक कसे झाले, हे त्यांच्या गावीही नव्हते. नाटय़गृहातील गोंधळ थांबवला तो निर्माते राहुल भंडारे आणि त्यांच्या कलाकारांनी. त्यांनी प्रेक्षकांना वीजपुरवठा नसल्याची माहिती दिली. प्रेक्षकांना नाटकाचा पहिला अंक एवढी पसंतीस पडला होता की, त्यांनी ‘आम्हाला नाटक पाहता आले नाही तरी चालेल, पण आम्हाला नाटक ऐकायचे आहे,’ अशी मागणी केली. काही उत्साही प्रेक्षकांनी मोबाइलच्या ‘टॉर्च’च्या मदतीने नाटक सादर करा, असे सांगितले आणि नाटकाचा दुसरा अंक रंगला तो मोबाइलच्या टॉर्चच्या प्रकाशात. ही खरे तर नाटय़गृहासाठी नामुष्कीची वेळ. पण व्यवस्थापकांना त्याचे काहीच नव्हते. आपल्यामुळे झालेली नामुष्की टाळण्यापेक्षा त्यांनी पोलीस स्थानक गाठले आणि नाटय़गृहात दंगल होऊ शकते, अशी तोंडी तक्रार केली. पोलीस नाटय़गृहात आले. प्रेक्षक चांगलेच वैतागलेले होते. पोलिसांबरोबर व्यवस्थापकही होते. पोलिसांनी प्रेक्षकांसह निर्माते भंडारे यांच्याकडून सर्व परिस्थिती जाणून घेतली आणि ‘पोलीस स्थानकात येण्यापेक्षा तुम्ही जनरेटर आणायला हवा होता,’ असे त्यांनी व्यवस्थापकाला सुनावले. नाटय़गृहाचे जनरेटर ऑगस्ट महिन्यातच पावसामुळे बिघडल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली. जनरेटर महिनाभर बंद का?, यावर व्यवस्थापकांनी थातुरमाथुर उत्तर दिलं. जनरेटर बॅकअप का आणला नाही? या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. बाहेरच्या जनरेटरने नाटय़गृहात वीज आणू शकत नाही, हा जावईशोध त्यांनी कुठून लावला, हे तेच जाणोत. जर नाटय़गृहात जनरेटर नव्हता तर त्याची आगाऊ माहिती त्यांनी निर्मात्यांना द्यायला हवी होती. त्यांनी कोणत्याच निर्मात्याला बुकिंग करायला द्यायला नको हवे होते, पण तसे व्यवस्थापकांनी केले नाही. या साऱ्या नामुष्कीसाठी जबाबदार कोण? निर्मात्यांना नुकसानभरपाई कोण देणार?, असे विचारल्यावर ‘सोशल सव्र्हिस लीग’चे नाव बेमूर्वतखोर व्यवस्थापकांनी पुढे केले. त्याचबरोबर या नामुष्कीची जबाबदारी घेण्यास किंवा माफी मागण्यासही ते तयार नव्हते. या साऱ्या प्रकाराला काय म्हणायचे? रंगदेवता आणि नाटय़ रसिकांचा हा अपमान नाही का? हे सारे प्रश्न पडले आहेत, पण त्यावर विचार करायला, उत्तरे शोधायला कुणीही तयार नाही.
सध्याची नाटकांची परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामध्ये ‘लिबर्टी’सारखे वास्तववादी नाटक प्रेक्षकांना नाटय़गृहांकडे खेचत असताना त्यांना प्रत्येक प्रयोगासाठी समस्यांची मॅरेथॉन स्पर्धा पार पाडावी लागत आहे. निर्माता संघ मरणासन्न आहे की कुंभकर्णासारखा झोपला आहे हे तेच जाणोत. त्यांना त्यांच्याच समस्या सोडवता येत नाहीत, त्यांचे एकमेकांचे पाय खेचण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामध्ये अशी नाटकं आणि रंगमंचावरील कामगार भरडले जात आहेत, पण त्याचे सोयरसुतक निर्मात्या संघाला नाहीच. पुरोगामी मराहाष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या महाराष्ट्रात असे प्रकार होणे लाजीरवाणेच. अशा वेळी ज्या नाटकाला सातासमुद्रापलीकडून मागणी आहे त्याचे महाराष्ट्रातील भवितव्य काय? नाटक, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, निर्माते यांना वाली कोण? आणि त्यांनी कोणाकडे पाहायचे, याचे उत्तर मिळत नाही आणि हीच गोष्ट मन विषण्ण करणारी आहे.