रेश्मा राईकवार

वास्तवदर्शी सिनेमांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक जेव्हा पूर्णत: काल्पनिक भविष्य रंगवणारा चित्रपट करतो तेव्हा नवल वाटल्याशिवाय राहात नाही. ‘क्वीन’ फेम दिग्दर्शक विकास बहल आणि स्वत:ला अभिनेता म्हणून सिद्ध करतानाही मोठय़ा प्रमाणावर हाणामारी आणि नृत्यकौशल्य यावरच अवलंबून असलेला टायगर श्रॉफ ही जोडी ‘गणपत’च्या निमित्ताने एकत्र आली आहे. मुळात विकास बहल यांचा लेखक आणि दिग्दर्शक या दोन्ही दृष्टीने काल्पनिक हाणामारी पट हा पिंड नाही. त्यामुळे त्यांच्या मूळ शैलीशी पूर्ण फारकत घेऊन केलेला हा चित्रपट वास्तव तर नाहीच, पण गोष्टीतलं कृत्रिम काल्पनिक विश्व ही पुरेशा रंजक पद्धतीने रंगवण्यात सपशेल अपयशी ठरला आहे.

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
delhi ganesh demise
दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं वृद्धापकाळाने निधन, हवाई दलातील सेवेनंतर सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण; ‘अशी’ होती कारकीर्द
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’

हॉलीवूडपटांच्या जवळ जाणारी मांडणी आणि चित्रण शैलीवर दिग्दर्शक विकास बहल यांनी ‘गणपत’मध्ये भर दिला आहे. मुळात कथेबरहुकूम मांडणी करताना कुठल्याशा हॉलीवूडपटात शोभेल असा वाळवंटी, नीरस प्रदेश, तिथे चित्रविचित्र कपडे अंगावर चढवलेल्या गरिबांची वस्ती, त्या पल्याड एकदम चकाचक अशी गगनचुंबी इमारतींची, रंगरंगिल्या क्लबची आणि गरिबांच्या जिवावर धंदा करत कोटय़वधी माया जमा करणाऱ्यांची अजब दुनिया अशा दोन वेगळय़ा विश्वांची रचना करण्यात आली आहे. त्यांचे एकूणच म्हणजे गरीब आणि श्रीमंत दोन्ही वस्तीतील माणसांचे राहणीमान, त्यांचे पोशाख पाहता त्यांच्या कथानायकाचे नाव गणपत कसे असेल? हा प्रश्न काही केल्या सुटत नाही. तर त्या गरीब वस्तीचे नायक म्हणजे दलपती (अमिताभ बच्चन) एक आकाशवाणी करतात, आपल्याला या दु:खातून, हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कोणी एक योद्धा येईल. त्याचं नावही ते जाहीर करतात ‘गणपत’. त्यामुळे इथे त्या अर्थाने कथानायकाला त्याच्या नावाच्या बाबतीत तरी निवडीचा पर्याय नाही. तर त्या श्रीमंत वस्तीत लहानाचा मोठा झालेला आणि तिथल्या तथाकथित मोठया गुंडाचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा गुड्डू काही कारणाने त्या गरिबांच्या वस्तीत येतो. हा संपूर्ण चित्रपट बॉक्सिंगसदृश कुठल्यातरी खेळाचा आधार घेऊन रंगवण्यात आला आहे. या खेळात जिंकून देण्यासाठी आपल्या बॉसला मदत करणाऱ्या गुड्डूला एका क्षणी आपणच बॉक्सिंगच्या त्या खेळातील उत्कृष्ट खेळाडू आहोत याची जाणीव होते. अर्थात, त्यापलीकडे जात दलपती, त्याने केलेली भविष्यवाणी आणि शेवटी ‘गणपत आला’ हे सांकेतिक वाक्य अशी एकेक साखळी गुड्डूशी जोडली जाते. गुड्डू कोण? गणपत कोण? दलपती कोण? आणि या सगळय़ांच्या असण्याचा उद्देश काय? अशा सगळय़ा प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत एका काल्पनिक कथेचा कृत्रिम भूलभुलैया दिग्दर्शकाने उभा केला आहे.

हेही वाचा >>>विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा! ‘द कश्मीर फाईल्स’नंतर महाभारतावर बनवणार चित्रपट, पोस्टर प्रदर्शित

सव्वादोन तासांच्या या चित्रपटात मुळात कथेशीच आपण जोडले जात नाही. लेखक – दिग्दर्शकाने एक वेगळीच भविष्याची झलक दाखवणारी काल्पनिक कथा लिहिली आहे अशी कल्पना करायची तरी शिवा, गुड्डू, दलपती, सना, जॉन द इंग्लिश मॅन अशी फार चिवित्र पात्ररचना यात आहे. म्हणजे केवळ व्हिडीओ गेममध्ये शोभाव्यात अशा गगनचुंबी इमारती आणि काहीसा रंगीबेरंगी क्लब म्हणजे भविष्यातील आधुनिकता असेल तर त्याची कल्पनाही न केलेली बरी.. एकीकडे ही दुनिया आणि दुसरीकडे दलपतीची काहीशी ‘बाहुबली’तील भावनिक नाटय़ाशी साधम्र्य सांगणारी आणि ‘मॅड मॅक्स फरी’ (ज्याचा उल्लेख गमतीने का होईना चित्रपटात येतो) या हॉलीवूडपटातील वाळवंटी वातावरणात रचलेली गरिबांची वस्ती.. कशाचा कशाशी संबंध लागत नाही. त्यामुळे पाहावी अशी एकच गोष्ट चित्रपटात आहे ती म्हणजे टायगर श्रॉफची हाणामारीची दृश्यं. त्यात तो कुशल आहे, त्यामुळे त्याची अ‍ॅक्शनदृश्ये पाहण्यासारखीच असतात. पण ती अ‍ॅक्शनदृश्ये आणि त्याचं नृत्य म्हणजे संपूर्ण चित्रपट असू शकत नाही. बरं त्याला एक पूर्ण कथा आहे, कथानायकाचा भूतकाळ आहे, पण तरीही त्याला भावनिकदृष्टय़ा व्यक्त होण्यासाठी दिग्दर्शक पुरेसा वावच देत नाही. त्यामुळे एक तर तो अ‍ॅक्शन तरी करतो किंवा नृत्य तरी करतो. बाकी अमिताभ बच्चन, रेहमान, क्रिती सनन, गिरीश कुलकर्णी अशा चांगल्या कलाकारांचा संच असला तरी त्यांनाही गणपतच्या भोवतीच फिरण्याशिवाय काहीही काम नाही. केवळ टायगरला डोळय़ांसमोर ठेवून केलेला हा कृत्रिम काल्पनिकपट आशय-विषय, मांडणी सगळय़ाच दृष्टीने फसला आहे. दिग्दर्शक विकास बहल यांचा त्यांच्या मूळ शैलीशी फारकत घेऊन केलेला वेगळा प्रयत्न म्हणावा तर तोही उल्लेखनीय सोडाच पाहण्याजोगाही वाटत नसल्याने ‘गणपत’चा एकूणच रागरंग फिका पडला आहे.

गणपत

दिग्दर्शक – विकास बहल

कलाकार – टायगर श्रॉफ, क्रिती सनन, अमिताभ बच्चन, गिरीश कुलकर्णी, रेहमान, जमील खान.