विवधतेमध्ये एकता हा प्रकार आपल्या भारतात हमखास पाहायला मिळतो. कित्येक विदेशी आक्रमणकर्त्यांनी आपल्या देशावर हल्ले करत आपली प्राचीन सभ्यता नष्ट करायचा पूर्णपणे प्रयत्न केलं, परंतु तरी आजही आपली संस्कृती व प्राचीन सभ्यता आपण जपली आहे. याचं एक मोठं उदाहरण आपल्याला २२ जानेवारी रोजी आयोध्येच्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळाले.
या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बऱ्याच मोठ्या सेलिब्रिटीजनी तसेच मनोरंजनविश्वातील वेगवेगळ्या कलाकारांनी हजेरी लावली. रामानंद सागर यांच्या अजरामर ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका निभावणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांच्याबरोबरच ‘सीता’ ही भूमिका निभावणाऱ्या दीपिका चिखलियादेखील या सोहळ्याला उपस्थित होत्या.
आणखी वाचा : मुस्लिम कुटुंबियाचा ‘रामायण’ फेम अरुण गोविल यांच्यासह फोटो काढतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले…
एकूणच सारा देश या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता. रामलल्लाचे दर्शन घेतल्यावर प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच भावना होती. मात्र आयोध्येमध्ये उपस्थित असूनसुद्धा अरुण गोविल यांना रामलल्ला यांचे दर्शन नीट घेता आले नाही अशी खंत नुकतीच त्यांनी व्यक्त केली आहे. ‘भारत २४ तसेच ‘एनडीटीव्ही इंडिया’शी संवाद साधताना अरुण गोविल म्हणाले, “आज स्वप्न तर पूर्ण झालं, पण रामलल्लाचे दर्शन नीट झाले नाही. मंदिरात प्रचंड गर्दी होती अन् त्यामुळे दर्शन नीट घेता आले नाही. पुन्हा निवांत येऊन दर्शन घ्यायला लागेल.”
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ची क्रेझ आजही कायम आहे. याच्याशी संबंधित कलाकार जिथे जिथे दिसतात तिथे सर्वजण गर्दी करून त्यांचे आशीर्वाद घेऊ लागतात. रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल असो की सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया असो. ९० च्या दशकात त्यांची घराघरात पूजा केली जात होती. आणि आताही असेच दृश्य पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयोध्येतील सोहळ्याला रजनीकांत, चिरंजीवी, राम चरण, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, विकी कौशल, कतरिना कैफ, रणबीर-आलिया, माधुरी दीक्षित, रोहित शेट्टीसारखे कित्येक मोठमोठे सेलिब्रिटीज हजर होते.