अरुण नलावडे हे नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहत ते साध सुध व्यक्तिमत्व. त्यांनी भूमिकाही आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशा अशाच केल्या. ‘श्वास’ चित्रपटात त्यांनी नातवासाठी तळमळणाऱ्या आजोबांची भूमिका केली तर त्यांच्या गंमत जंमत नाटकाने धमाल उडवली होती. आपल्या अभिनयाने त्यांनी अगदी साध्या भूमिकाही जिवंत केल्या. कॅरी ऑन मराठामध्ये अरुण नलावडे यांनी ग्रे शेड असलेली भूमिका साकारली आहे. पहिल्यांदा अशा वेगळ्या भूमिकेत आणि लूकमध्ये पाहायला मिळणार आहेत. सिनेमातला त्यांचा लूक त्यांच्या भूमिकेला साजेसा असा आहे. त्यांचे चाहते त्यांच्या या भूमिकेवरही प्रेम करतील यात शंकाच नाही.
आणखी वाचा