ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी या सध्या सिनेसृष्टीत सक्रीय नसल्या तरी त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत नायिकेसह खलनायिका म्हणूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेचे सोने करणे ही त्यांची खासियत आहे. अरुणा इराणींनी ३०० हून अधिक मराठी, हिंदी, गुजराती अशा विविध भाषिक चित्रपटात काम केले. अरुणा इराणी यांचा आज २ मे रोजी वाढदिवस आहे. त्यांनी त्यांच्या वयाची ७६ वर्षे पूर्ण केली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरुणा इराणी या आज सिनेसृष्टीत सक्रीय नसल्या तरी एकेकाळी त्यांच्याशिवाय दुसरी कोणतीही अभिनेत्री खलनायिकेच्या रुपात दिसायची नाही. खलनायिका म्हणून अरुणा इराणींना प्रत्येक दिग्दर्शकाची पहिली पसंती असायची. पण इतकं सर्व असताना त्यांनी सिनेृष्टी सोडण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतून हृता दुर्गुळेची एक्झिट, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

अरुणा इराणी यांनी काही वर्षांपूर्वी ई टाईम्सला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांना तुम्ही आता काम का करत नाही? असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना त्यांनी म्हटले की, “करोनामुळे या साथीच्या आजारामुळे मी सिनेसृष्टीत काम न करण्याचा निर्णय घेतला. माझ्या कुटुंबियांनी जोपर्यंत परिस्थिती चांगली होत नाही, तोपर्यंत काम करु नये”, असे सांगितले आहे.

“दोन मुलांचा अपघाती मृत्यू अन् साहेबांचे ते शब्द”, आनंद दिघेंच्या आठवणीत एकनाथ शिंदे भावूक

“कधीकधी मला मी पुन्हा काम करावं, असं सतत वाटतं. पण जीवाची भीती मला कोणताही नवीन प्रकल्प हाती घेण्यापासून रोखते. माझ्या कुटुंबातील सदस्यांनीही माझ्यावर काम बंद करण्यासाठी दबाव आणला. पण तरीही मी त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे, कारण त्यांना माझी काळजी वाटते. मी आतापर्यंत खूप काम केले आहे. पण आता माझ्यासाठी मोकळा श्वास घेण्याची वेळ आहे, जे मलाही योग्य वाटते. पण कधी कधी घरी बसून कंटाळा येतो”, असेही त्या म्हणाल्या.

छत्रपती शिवरायांच्या ‘या’ तडफदार सेनानीवर साकारणार महेश मांजरेकर आगामी चित्रपट

“सध्या सर्व स्थिती सामान्य होण्यासाठी बराच वेळ लागेल. त्यामुळे मी पुन्हा सेटवर कधी परतेन याबद्दल मी निश्चित सांगू शकत नाही. माझे वय पाहता मला असे वाटते की सिनेसृष्टीतून बाहेर पडण्यासाठी ही योग्य वेळ नाही. सध्या माझ्या आजूबाजूला खूप काम आहेत. पण मी सध्या कोणताही प्रोजेक्ट घेऊ शकत नाही. किमान यंदा डिसेंबरपर्यंत तरी मी कोणताही नवीन शो किंवा चित्रपट करणार नाही”, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

अरुणा इराणी यांनी ‘बेटा’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘उपकार’, ‘लाडला’, ‘राजा बाबू’, ‘लावारीस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उल्लेखीन भूमिका साकारली आहे. त्यासोबत त्यांनी ‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’, ‘देखा एक ख्वाब’, ‘परिचय: नई जिंदगी के सपने का’ आणि ‘झांसी की रानी’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aruna irani birthday special actress forced to quit work time defeated the villain of films nrp