‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेचे लाखो चाहते आहेत. मालिकेत नेहमीच आपल्याला वेगवेगळे ट्वीस्ट पाहायला मिळतात. मालिकेत आपल्याला अरुंधती संजनाकडून घर परत मिळवण्यासाठी लढताना दिसली. आता हळूहळू अरुंधती देशमुख कुटुंबाच्या जवळ येत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, या सगळ्यात अभिनं मात्र घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये अनघा बोलते की मी घरात छान रमली आहे. तर अभि तिला बोलतो, मी स्पष्टपणे सांगतो मला इथं रहायची इच्छा नाही. मला कंटाळ आलाय, आपण वेगळे रहायला जाऊया. यानंतर अनघा चिंतेत दिसते…त्यामुळे आता अभिनं घर सोडल्यानंतर देशमुख कुटुंब वेगळं होणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. कारण अरुंधतीच्या जाण्यानंतर अनघानं संपूर्ण कुटुंबाला जोडून धरलं होतं.
आणखी वाचा : “अमृताला खडूस नेत्रकटाक्ष…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
आणखी वाचा : योगा शिबिरात भेट ते सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न, नवनीत राणा यांची ‘प्यार वाली लव्हस्टोरी’
ज्या प्रकारे अरुंधती सगळ्यांची काळजी घ्यायची त्याच प्रमाणे अनघा संपूर्ण कुटुंबाला सांभाळताना दिसली. पण आता त्या दोघांनी घर सोडल्यानंतर आई आणि आप्पा यांचं काय होणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना आहेत.