गेल्या वर्षभरापासून बॉलिवूड इंडस्ट्रीला ड्रग्ज प्रकरणामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यापूर्वी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग्ज कनेक्शनमुळे अनेक सेलेब्सची चौकशी करण्यात आली होती. यानंतर आता बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित आणखी एक ड्रग्ज प्रकरण समोर आले आहे. यानंतर आता प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना रविवारी अटक केली. या प्रकरणानंतर आर्यन खान प्रवास करत असलेली बोट नेमकी कशी आहे, याचे एका दिवसाचे भाडे नेमके किती? याबद्दल अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. शाहरुख खानचा मुलगा आर्यनला इतर स्टार किड्सप्रमाणे लाइमलाईटमध्ये राहणं अजिबात आवडत नाही. आर्यन खान हा शाहरुखचा पहिला मुलगा आहे. तो फार लग्जीरियस जीवन जगतो. आर्यन खानला काल ज्या क्रूझवर अटक करण्यात ती एक लग्जीरियस बोट आहे. यात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.

कॉर्डेलिया क्रूझमध्ये अनेक सुविधा

मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या या क्रूझचे नाव कॉर्डेलिया क्रूझ (Cordelia Cruises) असे आहे. ही क्रूझ वॉटरवेज लेझर टूरिझम प्रायव्हेट लिमिटेडची आहे. या क्रूझमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या क्रूझमध्ये पार्टी करण्यासाठी आणि मित्रांसोबत एन्जॉय करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. अनेक जण या क्रूझमध्ये प्रवास केल्यानंतरचे क्षण दीर्घकाळ लक्षात ठेवतात.

या क्रूझची बरीच खास वैशिष्ट्य असून त्यामुळे अनेक सेलिब्रेटी याकडे आकर्षितही होतात. या क्रूझमध्ये पार्टी करण्याचा किंवा एका रात्रीचा खर्च प्रचंड आहे. या क्रूझमध्ये फूड कोर्ट देण्यात आले आहे. त्यात तीन स्पेशल रेस्टॉरंट आणि ४ बारचा समावेश आहे.

स्विमिंगपूल, नाईटक्लबसह फिटनेस सेंटरचीही सुविधा

विशेष म्हणजे या क्रुझमध्ये एका फिटनेस सेंटरचाही समावेश आहे. त्यासोबतच स्पा, सलून याचीही यात सुविधा देण्यात आली आहे. यासोबत या क्रूझमध्ये एक कसिनो आणि थिएटरही देण्यात आले आहे. तसेच मोठा स्विमिंगपूल, नाईटक्लब, लाईव्ह बँड, डिजे यासारख्या सुसज्ज सुविधाही यात देण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे यात शॉपिंग कॉम्पलेक्स आणि अॅडव्हेंचर अॅक्टिविटीसाठी सुविधा करण्यात आली आहे.

जर तुम्हाला क्रूझच्या आत असलेल्या सुविधांबद्दल प्रशस्त आहेत. या क्रूझचे कॅसिनो देखील खूप जबरदस्त आहे. या कॅसिनोतील बार देखील उत्तम आहे, जिथे तुम्ही तुमचे आवडते पेय घेऊ शकता. त्यासोबतच आपण आपल्या आवडीच्या संगीताचा आनंद घेऊ शकता.

एका रात्रीचे भाडे किती?

या क्रूझवर इतक्या सुविधा दिल्या गेल्या असल्या तरी त्याचे पॅकेज फार महाग आहे. कॉर्डेलिया क्रूझचे टूर पॅकेज १७७०० पासून सुरू होते. हा दर केवळ एका रात्रीसाठी आहे. कॉर्डेलिया क्रूझचे दोन रात्रीचे मुंबई ते गोवा टूर पॅकेज ५३१०० रुपये आहे. यामध्ये दोन जणांचा समावेश होऊ शकतो. तर, दोन जणांसाठी दोन रात्रीचे हाय सी पॅकेज ३५४०० रुपये आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aryan khan arrest ncb cordelia cruise tour packages inside view of cruise ship nrp