बॉलिवूड अभिनेता आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा आणि इतर काही आरोपींना क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती. जवळपास २६ दिवस तुरुंगात काढल्यानंतर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांना १४ अटी घालण्यात आल्या. त्या अटींनुसार दर शुक्रवारी त्यांना एनसीबी कार्यालयात हजर रहावे लागणार आहे. अरबाज आज वडिलांसोबत एनसीबी कार्यालयात हजर झाला होता. दरम्यान, त्याचा एक व्हिडीओ समोर आला असून चर्चेत आहे.
आज शुक्रवार असल्यामुळे अरबाज मर्चंट हा वडीलांसोबत एनसीबी कार्यालयात हजर होता. दरम्यान तेथे अनेक फोटोग्राफर उपस्थित होते. अरबाज एनसीबी कार्यालया बाहेर येताच फोटोग्राफर पोज देण्यास सांगतात. त्यावेळी त्याचे वडील अस्लम मर्चंट तेथे उपस्थित असतात. ते अरबाजला फोटोसाठी पोज देण्यास सांगतात. हे सर्व पाहून अरबाज वडिलांवर संतापतो आणि कपाळाला हात मारत हे सर्व थांबवा असे रागात म्हणतो. त्यानंतर तो रागात जाऊन गाडीत बसतो. अरबाज आणि त्याच्या वडिलांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुखची मुलगी सुहानाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय?
आणखी वाचा : आर्यन खानसोबत अटक झालेला अरबाज मर्चंट आहे तरी कोण? सुहाना खानही करते फॉलो
दरम्यान, २९ ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन मंजूर केला होता. हायकोर्टाने आपल्या आदेशाचा मुख्य भाग उपलब्ध करून दिला ज्यामध्ये आर्यन खान आणि या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर १४ अटी घालण्यात आल्या आहेत. तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामीनदारावर आणि तत्सम रकमेच्या दोन जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले. पोलिसांना कळवल्याशिवाय कोणीही मुंबई सोडू शकणार नाही, त्यांना दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहावे लागेल, असे या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे. जामीन आदेशानुसार, त्यांना त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागला आहे.