शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अनेक कलाकार त्याच्या समर्थनासाठी पुढे येत आहेत. आता संगीतकार विशाल दादलानीने शाहरुखचे समर्थन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशालने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्वीट केलं. “शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाचा वापर लोकांचे लक्ष वेधण्यासाठी केला जात आहे, अदानी बंदरातील ३ हजार किलो तालिबानी-ड्रग हेलिकॉप्टरपासून सगळ्यांते लक्ष घालवण्यासाठी आणि भाजप सदस्याच्या/आमदाराच्या मुलाने केलेल्या शेतकऱ्यांच्या हत्येपासून लक्ष वेधण्यासाठी त्याच्यावर निशाणा साधला आहे,”, असे ट्वीट विशाले सांगितले.

आणखी वाचा : “जेव्हा माझ्या ११ वर्षाच्या मुलाचे निधन झाले तेव्हा शाहरूख…”, शेखर सुमनचे ट्वीट व्हायरल

विशालने हे ट्वीट एका निर्मात्याने केलेल्या ट्वीटला रिट्वीट करत दिले आहे. “गेल्या ३० वर्षात #SRK सोबत काम करणारे किती निर्माते, दिग्दर्शक आज त्याच्यासोबत एकजूटीने उभे आहेत?”, असे त्या ट्वीटमध्ये म्हटले होते. दरम्यान, विशालने केलेले हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

आणखी वाचा : बिग बींनी जलसाजवळील जागा SBI ला दिली भाडेतत्वावर, भाडं ऐकून येईल चक्कर

दरम्यान, आर्यन खानची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. त्याच्यासोबत इतर पाच आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले. पुढील १५ दिवस आर्यनला जेलमधील सर्व नियम पाळावे लागणार आहेत. येत्या पाच दिवस आर्यनचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये असणार आहे. यावेळी जेलमध्ये आर्यन खानला कोणतीही खास ट्रीटमेंट दिली जाणार नाही. त्याला इतर कैद्यांप्रमाणेच वागवले जाईल. तसेच न्यायालयाच्या आदेशापर्यंत त्याला बाहेरचे काहीही अन्न मिळणार नाही. त्यांना फक्त तुरुंगाचे अन्न दिले जाणार आहे.