अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकला. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह सात जणांना रविवारी अटक करण्यात आली. या प्रकरणी आर्यन खानला येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीने छापेमारी दरम्यान अटक केलेल्या आठ जणांकडून अनेक गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा समावेश आहे.

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या त्या क्रूझवर जवळपास १८०० लोक उपस्थित होते. मात्र छापेमारीदरम्यान आठ लोकांना ताब्यात घेण्यात आलं. यात आर्यन खानचाही समावेश होता. आर्यन खान व्यतिरिक्त यात मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांनाही एनसीबीने ताब्यात घेतलं. यावेळी एनसीबीच्या टीमने १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएम ड्रग्जच्या २२ गोळ्या, ५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. यावेळी सर्व आरोपींकडून १ लाख ३३ हजार रोख रक्कमही जप्त करण्यात आली. या प्रकरणानंतर गोरेगावमधील श्रेयस नायर नावाच्या व्यक्तीलाही एनसीबीने अटक केली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर एनसीबीकडून सर्वांची कसून चौकशी केली जात आहे.

यावेळी अरबाज मर्चंटच्या बुटातून ड्रग्ज जप्त करण्यात आले. तर आर्यनव्यतिरिक्त इतरांनी लेन्स कव्हर, अंडरवेअरमध्ये ड्रग्स लपवले होते. तर मुलींनी सॅनिटरी पॅड्स, पर्सचे हँडल यात ड्रग्स लपवून ठेवले होते.

१) नुपूर सारिका ही दिल्लीत फॅशन डिझायनिंगचे काम करते. मिळालेल्या माहितीनुसार, नुपूरला मोहकने ड्रग्ज दिले होते, जे तिने फार हुशारीने सॅनिटरी पॅडमध्ये लपवले होते. मात्र सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवण्याची ही युक्ती फोल ठरली.

शाहरुखच्या मुलावर कारवाई केल्यानंतर समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “एखादं प्रकरण…”

२) इस्मीत सिंह हा दिल्लीत राहणार आहे. तो हॉटेल व्यावसायिक आहे. त्याच्याकडून एनसीबीने १४ MDMA Ecstasy pills जप्त केले आहे.

३) मोहक जसवालदेखील दिल्लीत राहणारी असून ती आयटी प्रोफेशनल आहे. तिने परदेशातही काम केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोहक ही स्वत: ड्रग्स घेऊन पार्टीत पोहोचली नव्हती. मोहकने मुंबईतून एका स्थानिक व्यक्तीकडून हे ड्रग्स खरेदी केले होते. त्यानंतर तिने नुपूरला ते सॅनिटरी पॅड्समध्ये लपवण्यासाठी सांगितले होते. पार्टीत तू मला हे दे, असे तिने नुपूरला सांगितले होते.

Aryan Khan : वेश बदलून एनसीबीचे अधिकारी क्रूझवर पोहोचले अन्…; नेमकं काय घडलं त्या रात्री?

४) विक्रांत छोकर हा देखील दिल्लीत राहणारा आहे. विक्रांतला मादक पदार्थांचे व्यसन लागले होते. त्याच्याकडून ५ ग्रॅम Mephedrone(intermediate quantity), १० ग्रॅम cocaine (intermediate) हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

५) गोमित चोप्रा हा दिल्लीतील रहिवासी असून तो हेअरस्टाइलिस्ट आहे. त्याने अनेक मोठ्या सेलिब्रेटींचा मेकअप केला आहे. आजतकच्या अहवालानुसार, गोमितने लेन्स बॉक्समध्ये ड्रग्स लपवले होते. एनसीबीला गोमितकडून 4 एमडीएमए गोळ्या आणि काही कोकेन मिळाल्याचे सांगितले जात आहे.

६) मुनमुन धामेचा ही एक फॅशन मॉडेल असून ती एका व्यावसायिक कुटुंबात वाढली आहे. ती मूळ मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहे. आई वडिलांच्या मृत्यूनंतर ती तिचा भाऊ प्रिन्ससोबत दिल्लीत राहते. ३९ वर्षीय मुनमुनला एनसीबीने औषधे बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. एनसीबीला मुनमुन धामेचाकडून ५ ग्रॅम चरस मिळालं आहे.

Cordelia Cruises : आर्यन खान प्रवास करत असलेल्या क्रूझचे एका रात्रीचे भाडे माहितीये का?

७) अरबाज मर्चंट आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन हे दोघेही फार चांगले मित्र असल्याचे सांगितले जातं आहे. ते दोघेही शालेय जीवनापासून एकत्र असल्याचे बोललं जात आहे. NCB ने अरबाजकडून ६ ग्रॅम चरस जप्त केली आहे. एनसीबीला अरबाजच्या फोन चॅटमधून काही माहिती मिळाली आहे.

८) श्रेयस नायर – मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या त्या क्रूझवर छापेमारी केल्यानंतर एनसीबीकडून मुंबईत काही छापेमारी करण्यात आली. यावेळी गोरेगावमधून श्रेयस नायरला अटक करण्यात आली. श्रेयस नायर हा आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांचा खास मित्र आहे. त्यांचे अनेक मोबाईल चॅट्सही समोर आले आहेत. श्रेयसही या दोघांचा शाळेपासून मित्र असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे या पार्टीला श्रेयसही जाणार होता. मात्र काही कारणामुळे त्याला जाता आले नाही.