शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. या छाप्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत आणखी लोकांना ताब्यात घेण्यात आले. रविवारी आर्यनला अटक करण्यात आली. ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर आर्यनची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांना नियुक्त करण्यात आलं आहे. एनसीबीने आर्यनवर दाखल केलेल्या आरोपांबद्दल न्यायालयासमोर सतीश आर्यनची बाजू मांडणार आहेत.
सतीश मानेशिंदे हे हाय प्रोफाईल प्रकरणांसाठी काही नवे नाहीत. त्यांनी याआधीही बॉलिवूडमधल्या अनेक स्टार्सची बाजू मांडली आहे. सतीश हे सर्व हाय प्रोफाईल प्रकरणांसाठी देशातले सर्वात प्रसिद्ध वकिलांपैकी एक म्हणून ओळखले जातात. एवढ्या मोठ्या वकिलाची एका दिवसाची फी किती असेल असा प्रश्न सगळ्यांचा पडला आहे.
आणखी वाचा : आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या क्रूझवरील पार्टीचा व्हिडीओ आला समोर
आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सलमान खानच्या १९९८ मधील काळवीट शिकार आणि संजय दत्तच्या १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणात बाजू मांडली होती. तेव्हा पासून सतीश मानेशिंदे हे चर्चेत आले आहेत. सतीश मानेशिंदे यांनी सलमान खानला ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात जामीनही मिळवून दिला होता. एवढंच नाही तर र सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांची बाजूही मानेशिंदे यांनीच मांडली होती. सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर या दोघांनाही ड्रग्स प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने अटक केली होती. या दोघांनाही नंतर जामीन मंजूर करण्यात आला. सतीश मानेशिंदे देशातील महागड्या वकिलांपैकी एक असून २०१० मधील एका रेकॉर्डनुसार ते दिवसाला १० लाख रुपये फी घेतात.
आणखी वाचा : ‘Big Boss 15’च्या घरामध्ये तोडफोड; स्पर्धकांमधील हाणामारीमध्ये झालं नुकसान
सतीश मनेशिंदे हे पालघर जमावबळी प्रकरणात विशेष सरकारी वकील आहेत. प्रसिद्ध दिवंगत वकील राम जेठमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १९८३मध्ये आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. त्यांनी जवळपास १० वर्षे जेठमलानी यांच्यासोबत काम केलं.