शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. २ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग पार्टीच्या छाप्यात आर्यन खानला ताब्यात घेण्यात आलंय. तर अद्याप आर्यनला जामीन मंजूर न झाल्याने २० ऑक्टोबरला होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत त्याला तुरुंगातच राहवं लागणार आहे.
आर्यन खानच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्याला आणि शाहरुखच्या कुटुंबाला पाठिंबा दिला आहे. तर सोशल मीडियावरून अनेकांनी त्याला ट्रोल केलं. आर्यनच्या अटकेनंतर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातच आता आर्यन खानचा एक नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो आर्यनला अटक करण्याच्या बरोबर एक आठवडा आधीचा आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर योगेश शाह यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.
आर्यन खानला मिळाला ९५६ कैदी नंबर; शाहरुखने जेलमध्ये मनी ऑर्डरने पाठवले ‘इतके’ रुपये
हा फोटो पाहून अनेकांना या फोटोत काय खास? असा प्रश्न पडेल. तर या फोटोत आर्यन खानने परिधान केलेल्या जॅकेटची सध्या चर्चा दिसत आहे. आर्यन खानच्या जॅकेटवर ड्रग्जशी संबंधित एक मेसेज लिहिलेला आहे. ‘डेथ मशिन LSD’ असं त्याच्या जॅकेटवर लिहिलेलं आहे. याचाच अर्थ LSD म्हणजेच जे एका प्रकराचं ड्रग्ज आहे ते मृत्यूचं मशीन आहे. म्हणजेच LSDच्या सेवनाने मृत्यू होवू शकतो असं सांगण्यात आलं.
ड्रग्जच्या सेवनाविरोधात जनजागृती करण्यासाठी अलीकडे अनेक तरुण असे संदेश असणारे जॅकेट परिधान करतात. मात्र ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या आर्यनने जनजागृतीचा संदेश देणारं हे जॅकेट परिधान केल्याचं पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत.