बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सतत चर्चेत असतो. कधी त्याच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या खासगी आयुष्यामुळे. काही दिवसांपूर्वी शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक झाली होती. त्यावेळी तो चर्चेत होता. त्यानंतर आता आर्यन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानूसार, आर्यन खान सध्या एका वेब सीरिजवर काम करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सध्या सीरिजबाबत ज्या काही आयड्या आहेत त्यामधील दोन अॅमेझॉन प्राइमवरील वेब सीरिजसाठी आणि एक चित्रपटासाठी आहे. या चित्रपटाची रेड चिली एंटरटेनमेंट निर्मिती करणार आहे. आर्यन काम करत असलेली सीरिज ही एका चाहत्यावर आधारीत आहे. ही एक थ्रिल्स असणारी कथा आहे. पण चित्रपटाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.’
आणखी वाचा : ट्विंकल खन्ना आहे ‘या’ आजाराने त्रस्त, पोस्ट करत म्हणाली…

सध्या स्क्रीप्टवर काम सुरु आहे. सीरिजला हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या दोन कल्पाना सोडल्या तर आर्यन आणखी काही गोष्टींवर काम करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन को-रायटर बिलाल सिद्दीकीसोबत ही स्क्रीप्ट लिहित आहे.

काही दिवसांपूर्वी आर्यन खान आयपीएलच्या ऑक्शनच्या वेळी दिसला होता. ड्रग्ज प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानंतर तो पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी पोहोचला होता. सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता आर्यन बॉलिवूडमध्ये एक अभिनेता म्हणून नाही तर लेखक म्हणून पदार्पण करताना दिसणार आहे.