भारतीय बॅडमिंटनपटूंनी रविवारी इतिहास रचत थॉमस चषक स्पर्धेत विजय मिळवला. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने १४ वेळा विजेत्या इंडोनेशियाचा ३-० असा धुव्वा उडवण्याची अनपेक्षित कामगिरी करत थॉमस चषक स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासातील भारताचे पहिलेच जेतेपद ठरले. भारतीय पुरुष बॅडमिंटन प्रशिक्षक माजी बॅडमिंटनपटू मॅथिअस बोई (Mathias Boe) हा अभिनेत्री तापसी पन्नूचा प्रियकर आहे. या ऐतिहासिक विजयानंतर तापसी पन्नूने तिच्या बॉयफ्रेंडसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

तापसी पन्नू ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसी ही वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तापसीने नुकतंच ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ भारताच्या बॅडमिंटन संघाच्या विजयादरम्यान आहे. तिने शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या घरातील आहे. यात तिच्या टीव्हीवर भारतीय बॅडमिंटन संघ जल्लोष करताना दिसत आहे.

‘कान्स’साठी निवडलेल्या ‘पोटरा’तील छकुलीच्या घरची परिस्थिती बिकट, अमित देशमुखांकडून १ लाखांची मदत

“भारताने इतिहासात प्रथमच थॉमस कप जिंकला, ते पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहोचले. शाब्बास बॉईज”, असे तिने कॅप्शन देताना म्हटले आहे. यासोबत तिने तिरंग्याचा एक इमोजीही शेअर केला आहे. यावेळी तिने मॅथिअस बोईला टॅग केले आहे. तापसीच्या या ट्विटवर त्यानेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘मिस्टर कोच तुम्ही सर्वोत्तम आहात’, असेही तिने त्याला टॅग करत म्हटले आहे.

कॉमेडियन भारती सिंहविरोधात तक्रार दाखल, दाढी-मिशीवरुन विनोद करणं पडलं महागात

तापसी आणि मॅथिअस हा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एका खेळादरम्यान त्या दोघांची त्यांची भेट झाली होती. “एकदा एका मुलाखतीदरम्यान तिने मला सिनेसृष्टीतील कोणत्याही व्यक्तीसोबत डेट करायचे नाही. मला माझे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगळे ठेवायचे आहे”, असेही तिने सांगितले होते.

२०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये मॅथिअस बोईने पुरुष दुहेरीत रौप्यपदक जिंकले होते. तो डेन्मार्कचा रहिवासी आहे. त्याने अनेक बॅडमिंटर दुहेरी स्पर्धेत विजेतेपदे पटकावली आहेत. २०२० मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर तो सध्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक म्हणून सक्रिय आहेत.

Story img Loader