मराठी चित्रपटांना विनोदाची मोठी परंपरा लाभली आहे. निरनिराळ्या धाटणीच्या विनोदाची हाताळणी मराठी चित्रपटांमध्ये मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली आहे. आगामी ‘मर्डर मेस्त्री’ हा विनोदी चित्रपटांच्या परंपरेपेक्षा वेगळा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. या चित्रपटाद्वारे प्रथमच विनोदी-रहस्यमय-थरारपट असे मिश्रण असलेले कथानक मांडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिग्दर्शक राहुल जाधव यांचे मानणे आहे. आशा भोसले यांनी गायलेल्या चित्रपटातील ‘अळी मिळी’ गाण्याचा व्हिडिओ चित्रपट रसिकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत. गाण्याचे बोल मंदार चोळकर यांचे असून, पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केले आहे. नाडियादवाला आणि वैभव भोर निर्मित या चित्रपटात एखादया छोट्याशा सवयीनेसुद्धा माणसाचं आयुष्य कसं बदलू शकतं हे दाखवण्यात आलं आहे. दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, हृषिकेश जोशी, विकास कदम, संजय खापरे, क्रांती रेडकर, मानसी नाईक, कमलाकर सातपुते अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. ‘मर्डर मेस्त्री’ मधल्या रहस्याचा गुंता १० जुलैला आपल्यासमोर उलगडणार आहे.

Story img Loader