भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं काल (रविवार ६ फेब्रुवारी) निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. फक्त भारतात नव्हे जगभरातून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. नुकतंच लता मंगेशकर यांची बहीण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी लतादीदींची खास आठवणी शेअर केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशा भोसले यांनी इन्स्टाग्रामवर लता मंगेशकर यांच्या आठवणीत एक फोटो शेअर केला आहे. आशा भोसले यांनी बालपणीचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपात आहेत. यात आशा भोसले आणि लता मंगेशकर या दोघीही कॅमेऱ्याकडे बघत पोझ देताना दिसत आहे. या दोघींच्या चेहऱ्यावरील निरागस रुप पाहायला मिळत आहे.

हा फोटो शेअर करत त्यांनी त्याला भावनिक कॅप्शनही दिले आहे. ‘बालपणीचे दिवस काय होते बहिण आणि मी’, असे कॅप्शन देत त्यांनी हार्ट इमोजी शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोवर अभिनेता सिद्धांत कपूरने कमेंट केली आहे. ‘लव्ह यू, आजी’, असे त्याने यात म्हटले आहे. दरम्यान आशा भोसले यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

लता मंगेशकर आणि श्रद्धा कपूरचे नाते काय माहित आहे का?

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.