Asha bhosle : भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेल्या दिग्गज गायिका म्हणून आशा भोसले यांना ओळखलं जातं. त्यांच्या सुमधूर आवाजाची जादू कायमच श्रोत्यांना भुरळ घालते. ९० च्या दशकातील अनेक सुपरहिट गाणी त्यांनी गायलेली आहेत. ‘दम मारो दम’, ‘एक मैं और एक तू’ ते अगदी ‘रेशमाच्या रेघांनी’पर्यंत अशी सदाबहार गाणी गाताना आपण आशा भोसले यांना नेहमीच पाहतो. पण, नुकत्याच एका कॉन्सर्टमध्ये त्यांनी आजच्या युगातील ट्रेडिंग गाणी गाऊन सर्वांनाच थक्क केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२४ मध्ये लोकप्रिय गायक संजू राठोडचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान हिट झालं. सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने या गाण्यावर रील्स व्हिडीओ बनवले होते. इतकंच नव्हे तर या गाण्याची लोकप्रियता परदेशात देखील पोहोचली होती. बॉलीवूड धकधक गर्ल माधुरी दीक्षितपासून ते आफ्रिकेच्या किली पॉलपर्यंत प्रत्येकाने या गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं आपण या वर्षभरात पाहिलं आहे.

हेही वाचा : सलमान खानच्या घरावर गोळीबार ते महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने कंगना रणौत यांना मारलेली झापड; २०२४ मधील सिनेविश्वातील १० वादग्रस्त घटना

आशा भोसले यांनी गायलं गुलाबी साडी गाणं

आता वर्षाखेरीस संजू राठोडचं हेच ‘गुलाबी साडी’ गाणं लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गाऊन ज्येष्ट गायिका आशा भोसले ( Asha bhosle ) यांनी सर्वांना भारावून टाकलं आहे. गाणं गाताना त्यांनी या गाण्यावरच्या हुबेहूब हूकस्टेप्स सुद्धा केल्या. या गाण्यावर त्यांचा परफॉर्म करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

आशा भोसले यांनी हे गाणं गाताना साडी देखील फिकट गुलाबी रंगाचीच नेसली होती. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांची ही एनर्जी पाहून सगळेजण थक्क झाले आहेत. “अभिमानास्पद”, “हाच तो खरा क्षण आहे”, “सुंदर”, “या वयात नवीन गाणी आत्मसात करून गाणं ही मोठी गोष्ट आहे” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर करत या ज्येष्ठ गायिकेचं भरभरून कौतुक केलं आहे.

हेही वाचा : हॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध जोडप्याचा ८ वर्षांनी झाला घटस्फोट; अभिनेत्रींच्या वकिलांनी दिली माहिती म्हणाले, “तिने आणि तिच्या मुलांनी…”

दरम्यान, ‘गुलाबी साडी’प्रमाणे आशा भोसले यांनी २०२४ मध्ये इन्स्टाग्रामवर ट्रेडिंग ठरलेलं आणखी एक गाणं या कॉन्सर्टमध्ये गायलं. विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ गाण्याची हूकस्टेप करत त्यांनी ( Asha bhosle ) कॉन्सर्टमध्ये ठेका धरला होता. या गाण्याचा गायक करण औजलाने आशा भोसले यांचा ‘तौबा तौबा’ गाणं गातानाचा व्हिडीओ शेअर करत यावर ‘माझ्यासाठी हा सर्वोत्तम क्षण’ असं कॅप्शन दिलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asha bhosle sings trending gulabi sadi song in recent concert video viral sva 00