पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुरलेले वारकरी आणि पायवारी दरम्यानचा त्यांचा उत्साह अगदी पाहण्यासारखा असतो. टाळ-मृदुंगाच्या गजरामध्ये वारकरी मग्न होऊन जातात. अशा प्रसन्न आणि भक्तीमय वातावरणाची कलाकारांना देखील भूरळ पडली. संदीप पाठक, स्पृहा जोशी, प्राजक्ता गायकवाड यांनी पांडुरंगाच्या वारीमध्ये सहभाग घेतला. आता याच कलाकारांच्या जोडीने अभिनेता स्वप्निल जोशी देखील पायवारीमध्ये सहभागी झाला होता. वारकऱ्यांचा उत्साह, भक्तीमय वातावरण पाहून तो अगदी भारावून गेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – अभिमानास्पद! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील दत्तू मोरेच्या ठाण्यातील चाळीला दिलं त्याचच नाव, अभिनेता म्हणतो…

स्वप्निलने पायवारी दरम्यानचा अनुभव आणि त्यादरम्यान वारकऱ्यांशी साधलेला संवाद याबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. तसेच त्याने काही फोटो देखील शेअर केले आहेत. “काल वाखरी ते पंढरपूर पाई वारी चाललो. अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला काल सुरुवात झाली. कधी तरी पूर्ण वारी चालायची आहे. बघू, पांडुरंग कधी संधी देतो? पण काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही.” अशा शब्दांमध्ये स्वप्निलने आपला अनुभव सांगितला.

पुढे बोलताना तो म्हणाला, “आम्ही चित्रपटामध्ये काम करणारे कलाकार. पण खरे हिरो हे वारकरी. वर्षानुवर्षे तहान भूक विसरून, पाई वारी चालतात. पायाला सूज येते. पण मनाची, विचारांची सूज कायमची निघून जाते. त्यांचे आशीर्वाद घेऊन धन्य वाटलं. लिहायचं खूप आहे पण शब्द सुचत नाहीत. हा प्रवास प्रत्येकाने एकदा तरी करावाच.”

आणखी वाचा – वारकऱ्यांबरोबर पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रमला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, साधेपणा पाहून चाहत्यांनीही केलं कौतुक

स्वप्निलला या वारीदरम्यान त्याच्या आजीची आठवण आली. तेव्हा तो म्हणाला, “माझी आजी म्हणायची, तुम्ही वारी चालला नाहीत तर तुम्ही जिवंत न्हाईत…काल मला कळलं ती असं का म्हणायची…जय हरी विठ्ठल.” स्वप्निलने त्याच्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत वारीमध्ये सहभाग घेतला. यावेळी वारीचा आपल्याला आलेला अनुभव शब्दात व्यक्त करणंही कठीण झालं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashashi ekadashi 2022 actor swapnil joshi at pandharpur wari and he share his experience photos on instagram see details kmd