पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुरलेले वारकरी आणि पायवारी दरम्यानचा त्यांचा उत्साह अगदी पाहण्यासारखा असतो. मराठी कलाकारही वारीमध्ये सहभागी होताना दिसले. अभिनेता स्वप्निल जोशीने तर वाखरी ते पंढरपूर पाई वारी केली. वारकऱ्यांचा उत्साह पाहून तो अगदी भारावून गेला होता. माउलींचा जयघोष करत स्वप्निल वारकऱ्यांबरोबर फुगड्या घालत होता. यादरम्यानचा अनुभव स्वप्निलने सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “वारकरीच खरे हिरो”; माउलीचा जयघोष करत स्वप्निल जोशीचा वारीमध्ये सहभाग, शेअर केली खास पोस्ट

“वारीमध्ये सहभागी होण्याची अनेक वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली.” असं स्वप्निलने यावेळी सांगितलं. तसेच वारकऱ्यांच्या पाया पडत स्वप्निलने त्यांचे आशिर्वाद घेतले. डोक्यावर वारकरी टोपी, सदरा असा स्वप्निलचा लूक यावेळी पाहायला मिळाला. कलाकारांचे विविध व्हिडीओ, मुलाखती पाहण्यासाठी लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘LoksattaLive‘ या युट्यूब चॅनेलला भेट द्या आणि सब्सक्राइब करा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashashi ekadashi 2022 actor swapnil joshi at pandharpur wari says i am happey to be here see his video kmd