अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी काही महिन्यांपूर्वी रुपाली बरुआशी दुसरं लग्न केलं. आशिष आणि त्यांची पहिली पत्नी राजोशी विद्यार्थी उर्फ ​​पीलू लग्नाच्या २२ वर्षांनी वेगळे झाले होते, मात्र याची कोणालाच माहिती नव्हती. दोघांनाही एक मुलगा असून तो परदेशात शिकत आहे. पीलू सध्या त्यांच्या ‘अकेली’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आशिषपासून घटस्फोट घेतल्यानंतर राजोशीला पोटगी म्हणून मोठी रक्कम मिळाल्याचे वृत्त समोर येत आहे, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मी त्यांना माझं सत्य सांगितलं अन्…”, आशिष विद्यार्थींच्या पहिल्या पत्नीने सांगितलं घटस्फोटाचं कारण; म्हणाल्या, “माझी चॉइस…”

‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत राजोशी यांनी त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं. यावेळी त्यांनी सांगितलं की एक मुलाखत व्हायरल झाली होती व यावरून वाद सुरू झाला. काही लोक चांगल्या गोष्टी बोलत होते, पण अनेकजण या बातमीने निराश झाले होते. अनेकांनी मी पोटगी म्हणून मोठी रक्कम घेतली आहे, असंही म्हटलं. यामुळे मला खूप वाईट वाटलं. घटस्फोट घेणं इतकं सोपं नाही आणि मी आता त्याबद्दल विचार करत नाही असं त्या म्हणाल्या.

आशिष विद्यार्थी नव्हे तर त्यांच्या पहिल्या पत्नीनेच घेतलेला घटस्फोट; स्वतः कारण सांगत म्हणाल्या, “एकेदिवशी माझ्या…”

मुलगा अर्थ चित्रपटांमध्ये येईल का, याबाबतही राजोशी यांनी माहिती दिली. “अर्थला चित्रपटांमध्ये कधीच रस नव्हता. पण, त्याला संगीतात रस आहे, काही गोष्टी तो आमच्याकडूनच शिकला. घरी त्याचा गिटार आणि कीबोर्ड आहे,” असं राजोशी यांनी सांगितलं.

बाळाच्या जन्मानंतर तीन महिन्यात वेगळं झालं सेलिब्रिटी जोडपं; ५२ वर्षांनी लहान तरुणीबरोबर नात्यात होता ८३ वर्षीय अभिनेता

दरम्यान, “पतीला पत्नी म्हणून जी साथ हवी असते, ती मी त्यांना देऊ शकत नव्हते. पण मी कधीच त्यांचा तिरस्कार केला नाही. त्यांनी मला मारलं किंवा घरात डांबून ठेवलं नव्हतं. प्रत्येकजण वेगळा असतो, कोणीही चुकीचं नाही, कोणीही बरोबर नाही, परंतु मी आता स्वतःला कोणाची तरी बायको म्हणून पाहू शकत नाही. मी त्यांना माझे सत्य सांगितले आणि त्यांनी त्याचा आदर केला आणि स्वीकारला,” असं राजोशी त्यांच्या घटस्फोटाबद्दल बोलताना म्हणाल्या होत्या.

Story img Loader