गेल्या काही दिवसांपासून सविता भाभी ही चर्चेत आहे. हे पात्र ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटातील आहे. खरतर एका अनोख्या पद्धातीने चित्रपटाचे प्रमोशन केल्यामुळे सोशल मीडियावर चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. नुकताच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटातील मुख्य पात्र सविता भाई उर्फ सई ताम्हणकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चित्रपटातील गाण्याचा आहे. या गाण्याचे नाव ‘तुला बघाया जमंल गर्दी लांब, सविता भाभी तू इथंच थांब!’ असे आहे. हे गाणे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरल्याचे दिसत आहे.
या चित्रपटात अभय महाजन, पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचसोबत सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके, अमेय वाघ हे चेहरेही या चित्रपटात दिसणार आहेत. आलोक राजवाडे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.या चित्रपटाची निर्मिती गौरी आणि बनी डालमिया, सुरेश देशमाने, विनोद सातव यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या ६ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.