भावगीते, भक्तिगीते, नाटक आणि चित्रपटांसह जाहिरातींसाठी दिलेले संगीत अशा संगीत क्षेत्रातील विविध प्रकारांमध्ये स्वररचनांच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे संगीतकार म्हणजे अशोक पत्की. आजवरच्या कारकिर्दीत अशोक पत्की यांनी अनेक गीतांसाठी संगीत दिलं आहे. परंतु, कोणतीही स्वररचना करताना वेळ, काळ याची गरज नसून ते कोणत्याही क्षणी सुचू शकतं. अशाच एका गाण्याचा रंजक किस्सा त्यांनी लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’मध्ये सांगितलं.
आणखी वाचा
दरम्यान, कोणतं काव्य किंवा संगीत सुचण्यासाठी वेळ, काळ यांची गरज नसते. ते कोणत्याही क्षणी पटकन सुचू शकतं. तसंच काहीसं अशोक पत्की यांच्या बाबतीत घडलं. एका रात्री अचानक लाइट केल्यावर त्यांना ‘काळोख दाटूनी आला’ हे गाणं सुचलं. परंतु त्यावेळी नेमकं काय- काय घडलं होतं याविषयी त्यांनी सविस्तर चर्चा या मुलाखतीत केली.