आज मराठी चित्रपट देखिल ही ‘पोर साजुक…’ अथवा ‘बलम पिचकारी…’ अशा मसालेदार आयटम नृत्यगीतामध्ये रमलाय. पण २५-२६ वर्षापूर्वी असे एखादे सळसळते वा धमाकेदार गीत-नृत्य व तेदेखील हिंदीतील स्पष्टवक्ती म्हणून इमेजवाल्या फराहवर? चित्रपटाचा निर्माताच जर हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अँक्शन दिग्दर्शक असेल तर ते शक्य आहेच. अशा राम शेट्टीने ‘बलिदान’ चित्रपटाची निर्मिती करताना विनय लाडकडे दिग्दर्शन सोपवले व दारूच्या गुत्यावरील गीत नृत्याची संधी येताच फराहला मराठीत आणले. त्याच्या ‘खतरनाक’ या हिंदी चित्रपटात ती तेव्हा संजय दत्तची नायिका होती. चित्रनगरीत गुत्ता सेट लागला. अशोक सराफ वेगळ्या गेटअपमध्ये होता व फराहचे नृत्य म्हणून आम्हा सिनेपत्रकाराना सेटवरही बोलावले. ‘सोनेरी दारू अन गोरी गोरी पारू…’ हा गाण्याचा मुखडा त्या काळात थोडा धाडसी वाटला. विवेक आपटेचे गीत व अनिल मोहिले यांचे संगीत होते. फरहाने गाण्याचे बोल व मुड पटकन पकडला. म्हणून तर दोन दिवसात चित्रीकरण संपले.हिंदीतील पाहुणी मराठीत म्हटल्यावर सेटवर काही वेगळाच फिल येतो हे यावेळीही जाणवले पण त्याचे उत्तर कधीच शोधायचे नसते….
फ्लॅशबॅक : अन् गोरी गोरी पारू…
फरहाने गाण्याचे बोल व मुड पटकन पकडला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 20-05-2016 at 01:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok saraf and farah