अभिनेते अशोक सराफ हे मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांचे विनोद हे प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. त्यांचे विनोद पाहता ते गेल्या अनेक वर्षांपासून विनोदी भूमिका साकारत आहेत. सध्या अशोक सराफ लाईमलाइटपासून लांब आहेत. त्यांची सिंघम चित्रपटातील भूमिका ही अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांच्या या भूमिकेवर आज ही मीम्स व्हायरल होताना दिसतात. याच अशोक सराफ यांना मराठी चित्रपटसृष्टीतील सम्राट अशोका म्हणून ओळखले जातात.
अशोक यांनी १९६९ साली चित्रपट आणि छोट्या पडद्यावर पदार्पण केले. अशोक यांनी २५० पेक्षा जास्त मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातले १०० चित्रपट गाजले. अशोक यांनी १८ वर्षांचे असताना अभिनय करायला सुरुवात केली. ‘एक डाव भुताचा’, ‘धूम धडाका’ आणि ‘गम्मत जम्मत’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये त्यांनी ‘करण-अर्जुन’, ‘येस बॉस’ आणि ‘सिंघम’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या विनोदांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.
View this post on Instagram
एका वृत्तानुसार, २७ ते २८ वर्षांपूर्वी अशोक यांच्या गाडीचा अपघात झाला होता आणि या अपघातात ते थोडक्यात वाचले होते. मात्र, अशोक यांच्या मानेला दुखापत झाली होती. त्यानंतर ६ महिने त्यांना आराम करण्यास सांगण्यात आले होते. पुन्हा एकदा २०१२ मध्ये पुणे एक्सप्रेस हायवेवर अशोक यांचा दुसरा अपघात झाला. या अपघातातही अशोक यांनी मृत्यूला पुन्हा एकदा हरवले होते.
आणखी वाचा : आई कुठे काय करते! : संजनाने ‘या’ कारणामुळे अनिरुद्धला लगावली कानशिलात
अशोक यांनी वयाने १८ वर्ष लहान असलेल्या निवेदिता सराफ जोशी यांच्याशी लग्न केले. या दोघांनी गोव्यातील एका मंदिरात १९९० मध्ये लग्न केले. अशोक यांना एक मुलगा असून अनिकेत सराफ असे त्याचे नाव आहे. अनिकेत एक पेस्ट्री शेफ आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : करिश्मा आणि करीनाच्या शाळेची फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते- रणधीर कपूर
अशोक सराफ यांनी २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम’ या चित्रपटात एका पोलिसाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अजय देवगन आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर त्यांनी २०२० मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘प्रवास’ यात मुख्य भूमिका साकारली. अशोक यांना आता लाईमलाइटपासून लांब रहायचे असून त्यांच्या कुटूंबासोबत आता संपूर्ण वेळ घालवायचा आहे.